शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणी केंद्राला छावणीचे रूप

By admin | Updated: October 19, 2014 01:14 IST

ऐरोली आणि बेलापूर विधानसभेची मतमोजणी आज वाशी येथे होणार आहे. त्याकरिता मतमोजणी केंद्रावर शनिवारपासूनच पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नवी मुंबई :  ऐरोली आणि बेलापूर विधानसभेची मतमोजणी आज वाशी येथे होणार आहे. त्याकरिता मतमोजणी केंद्रावर शनिवारपासूनच पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निकाल ऐकण्यासाठी जमणा:या कार्यकत्र्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. 
विधानसभेसाठीचे मतदान बुधवारी संपूर्ण राज्यात पार पडली. रविवारी याची मतमोजणी होणार आहे. त्यानुसार बेलापूर आणि ऐरोली या दोन मतदार संघाची मतमोजणी वाशी सेक्टर 4 येथील सिक्रेट हार्ट शाळेमध्ये होणार आहे. त्याकरीता शनिवारपासूनच या शाळेला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. परिमंडळ 1 मध्ये होत असलेल्या या मतमोजणीसाठी 3क्क् हून अधिक पोलिस कर्मचा-यांसह वरिष्ठ अधिकारीही बंदोबस्तावर कार्यरत राहणार आहेत. तर मतमोजणी केंद्राच्या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता यावे याचीही पोलिसांनी दक्षता घेतली असून टेहळणी मनोरा तयार करण्यात आला आहे.  त्याद्वारे संपूर्ण परिसरातील हालचालींवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे.  मतमोजणी केंद्रामध्ये दोनही विधानसभा क्षेत्रचे सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्याव्यतीरीक्त निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असलेल्या व्यक्तीलाच आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. निकालाची उत्सुकता असलेले राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने मतमोजणी केंद्रावर जमणार आहेत. 
यंदा प्रथमच सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्याने कार्यकत्र्याची गर्दी वाढण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मतमोजणी केंद्रासमोरच असलेल्या मैदानात कार्यकत्र्याना थांबण्याची सोय करण्यात आली आहे. तेथे लाउडस्पिकरवरून वेळोवेळी निकालांची घोषणा केली जाणार आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकत्र्यामध्ये निकालानंतर वाद निर्माण होऊ नये याचीही पुरेशी खबरदारी घेतली असल्याचे एका पोलीस अधिका-याने सांगितले. (प्रतिनिधी)
 
मतमोजणी केंद्रावर कोणताही गैर प्रकार होऊ नये यासाठी सुमारे 3क्क् पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्रशिवाय कोणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही. तर कार्यकत्र्यासाठी मैदानामध्ये निकाल ऐकण्याची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे.
- शहाजी उमाप, पोलीस उपायुक्त, परिमंडळ -1
 
वाहतुकीच्या मार्गात बदल
मतमोजणीच्या अनुषंघाने सिक्रेट हार्ट शाळेसमोरील रस्त्यावर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार वाशी पोलीस ठाने ते एनबीएसए टेनिस मैदानार्पयतचा रस्ता सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेर्पयत बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी केले आहे.