शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

विहित वेळेत कालवे खोदले नाहीत

By admin | Updated: May 10, 2017 00:17 IST

मुरुड तालुक्यातील आंबोली धरण बांधून पाच ते सहा वर्षे पूर्ण झाली असतील, परंतु कालव्याचे पाणी शेतीला विहित वेळेत

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव/ मुरुड : मुरुड तालुक्यातील आंबोली धरण बांधून पाच ते सहा वर्षे पूर्ण झाली असतील, परंतु कालव्याचे पाणी शेतीला विहित वेळेत न सोडल्याने असंख्य कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून याला संबंधित शासन जबाबदार असल्याचा निर्वाळा अलिबाग-मुरूडचे आमदार पंडित पाटील यांनी दिला आहे. यासाठी येत्या अधिवेशनात आवाज उठवू असा इशारा दिला आहे.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी करून सुद्धा ही मागणी दुर्लक्षित झाली आणि मे महिन्यात शेतीला पाणी सोडले गेले नाही तर जमिनी कोरड्या पडून नापीक होण्याचा धोका यावेळी आमदार पंडित पाटील यांनी व्यक्त केला आहे. कोकणातील शेतकरी पाणी असून सुद्धा उपाशी राहिला असल्याची टीका यावेळी आमदार पाटील यांनी केली आहे. पाणीप्रश्नाबाबत ते आपली भूमिका स्प्ष्ट करताना पत्रकारांशी बोलत होते.यावेळी आमदार पाटील म्हणाले की,कालव्याने जर शेतीला पाणी पुरवठा झाला तर धरणातील पाणी वाहून गेल्याने पाणी जमिनीत मुरेल त्यामुळे आजूबाजूला असणारे विहिरी, तलावे व नाले यांना भरपूर प्रमाणात पाणी लागू शकते. परंतु हेच धोरण नेमके शासनाने उलटे लागू केले आहे. जर धरणातील पाणी बंदिस्त पाइपने पुरविले तर त्याचा फायदा आजूबाजूला असणाऱ्या नद्या व तलावांना होणार नाही. मग असे बंदिस्त पाइप लाइनचे धोरण काय उपयोगाचे याचा शासनाने गंभीर विचार करावा, अन्यथा येत्या अधिवेशनात यावर आवाज उठवू असा इशारा आमदार पंडित पाटील यांनी दिला.