शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

जैवविविधता उद्यान सुरू

By admin | Published: April 14, 2016 12:09 AM

अलिबाग तालुक्यातील वडखळ-अलिबाग मार्गावर असलेल्या तीनवीरा धरणाच्या कुशीत जैवविविधता उद्यान सुरू करण्यात आले आहे. हे उद्यान शापूरजी पालनजी आणि रायगड जिल्हा

कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील वडखळ-अलिबाग मार्गावर असलेल्या तीनवीरा धरणाच्या कुशीत जैवविविधता उद्यान सुरू करण्यात आले आहे. हे उद्यान शापूरजी पालनजी आणि रायगड जिल्हा परिषदेचा एकत्रित उपक्रम आहे. अगोदरच निसर्गरम्य असलेल्या या ठिकाणी आणखी एका अनमोल नैसर्गिक वनस्पतींचे ठिकाणाने महाराष्ट्रात वेगळी ओळख होणार आहे.पर्यावरणाचे संवर्धन आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेता यावा म्हणून शापूरजी पालनजी आणि जिल्हा परिषदेचा उद्देश आहे. निसर्गाच्या संवर्धनासाठी शापूरजी आणि पालनजी यांनी रायगड जिल्ह्यात जवळ जवळ तीन लाख ७५ हजार वृक्षलागवड केली आहे. तीनवीराच्या एक एकर उद्यानात ५० हजार झाडांची एकूण ५०० पेक्षा जास्त जातींची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सतरा विभागात निरनिराळ्या प्रकारची झाडे आहेत. यामध्ये फुलझाडे, भाजी, औषधी वनस्पती, मसाल्याचे पदार्थांच्या वनस्पती तसेच दुर्मीळ वनस्पती भारतातील अन्य ठिकाणाहून आणून लागवड सुंदररित्या करण्यात आली आहे. तसेच प्राणी, पक्षी, कीटक यांना फिरण्यासाठी हे एक प्रकारचे त्यांच्या दृष्टीने घरच आहे. तसेच पर्यावरणस्रेही यांनी या उद्यानाचा आनंद काळजीपूर्वक घ्यावा. या उद्यानातील वनस्पतींच्या माहितीमुळे येथील पूर्ववत असलेल्या वनस्पतींचे संवर्धन होण्यास मदत होईल.या उद्यानाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील दिव्यांचे आकारही रुईसारख्या भारतीय प्रजातीच्या, कमळाच्या, पथदिवे काटेसावर, तर झुंबर खैराच्या बियांसारखे आहेत. हे उद्यान म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना जीवशास्त्राविषयी अभ्यास सांगणारे ठिकाण ठरणार आहे. या उद्यानाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य अ‍ॅड. आस्वाद पाटील, जरीन कमिसरियत, डॉ. रशने पारदीवाला आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)