शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आयटीच्या जमान्यात आयटीआय मागे

By admin | Updated: December 7, 2014 22:20 IST

माहिती आणि तंत्रज्ञानाची चलती असलेल्या या जमान्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ट्रेंड आणि अभ्यासक्रम आहे तसाच आहे.

प्रशांत शेडगे, पनवेलमाहिती आणि तंत्रज्ञानाची चलती असलेल्या या जमान्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ट्रेंड आणि अभ्यासक्रम आहे तसाच आहे. त्यामध्ये फारसा बदल न झाल्याने या ठिकाणाहून प्रशिक्षण घेणा-यांना रोजगाराची संधी कमी झाली आहे आणि त्यामुळे आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्याही रोडावत चालली आहे. काही वर्षापूर्वी दहावी आणि बारावीनंतर आयटीआयमध्ये प्रवेश घेवून दोन वर्षाच्या आत झटपट नोकरी मिळत असल्याने या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या जास्त असायची. अनेकदा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेशाकरिता गुणवत्ता यादी लागायची. दहावीतील मिळालेल्या गुणानुसार प्रवेश मिळत असे, त्याकरिता पालकांना मोठी कसरत करावी लागायची. पनवेल येथील आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याकरिता जिल्हाच काय तर राज्यभरातून विद्यार्थी येत असत. याचे कारण म्हणजे आजूबाजूला तळोजा, पाताळगंगा एमआयडीसी उभ्या राहिल्या होत्या. या ठिकाणी अनेक कंपन्या सुरु झाल्याने त्यांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यामुळे आयटीआयच्या कॅम्पसमध्येच भरती होत असे. फिटर, मॅकॅनिकल्स, मिल राईट मेंटनेन्स, मशिनिस्ट, ग्रायन्डर, वेल्डर, टर्नर या ट्रेडला अधिक महत्त्व असायचे. याचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्याला नोकरी मिळणार म्हणजे मिळणार. एकंदरीतच या ट्रेडला ग्लॅमर होते, मात्र गेल्या काही वर्षात कारखान्यांमध्ये अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आली. केवळ पनवेलच नाही तर थोड्या फार फरकाने सर्वच आयटीआयमध्ये अशी परिस्थिती असून जुनाट झालेल्या इमारतीत जुनेच ट्रेंड सध्या सुरू आहेत. आयटीआयमधून बाहेर पडणाऱ्या उमेदवाराला लगेचच नोकरी मिळत नसल्याचे एका एजन्सीचे संचालक मधुकर पाटील यांचे म्हणणे आहे.