शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
4
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
5
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
6
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
7
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
8
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
9
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
10
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
11
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
12
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
13
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
14
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
15
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
16
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
17
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
18
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 05:51 IST

सुशांत जाबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते त्यांच्या कारने निवडणुकीचा आढावा घेत असताना काही जणांनी कारजवळ जात शिवीगाळ दमदाटी आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

महाड : महाड नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी झालेल्या दोन गटांतील हाणामारी प्रकरणात महाड शहर पोलिस ठाण्यामध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलिसांनी २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अजित पवार गटाचे  सुशांत जाबरे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये शिंदेसेनेच्या विकास गोगावले यांच्या नावाचा समावेश केला आहे. सुशांत जाबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते त्यांच्या कारने निवडणुकीचा आढावा घेत असताना काही जणांनी कारजवळ जात शिवीगाळ दमदाटी आणि जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर प्रचंड आक्रमक होत आजुबाजूच्या गाड्यांच्या काचा फोडल्या. माझ्यासह अंगरक्षक गोपाल सिंग यालाही मारहाण केली, असा आरोप सुशांत जाबरे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.  

याप्रकरणी विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सुरज मालुसरे, सिद्धेश शेठ (सर्व रा. ढाळकाठी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

दुसऱ्या तक्रारीत महेश निवृत्ती गोगावले (३९, रा. पिंपळवाडी, महाड) यांनी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सुशांत जाबरे रा. टोळ, हनुमंत मोतीराम जगताप, श्रीयश माणिक जगताप, धनंजय (बंटी) देशमुख, जगदीश पवार (सर्व रा. महाड), नीलेश महाडिक (रा. किंजळोली, महाड) तसेच  अमित शिगवण, व्यंकट मंडाला, गोपालसिंग, मंजितसिंग अरोरा, मोनीश पाल, समीर रेवाळे आणि इतर ८ ते १० जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, दोन गटांत झालेल्या हाणामारीत परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

तक्रार महाड शहर पोलिस ठाण्यात वर्ग

गोगावले यांच्या तक्रारीनुसार, वरील सर्व आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने जमाव जमवला. यापैकी गोपालसिंग यांनी बंदूक रोखून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, तसेच इतरांनी काठी व हॉकीस्टिकने कार्यकर्त्यांना मारहाण केली. 

यादरम्यान विजय मालुसरे यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून नेल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या दोन्ही तक्रारी एकाच घटनेच्या परस्परविरोधी तक्रारी असून, संपूर्ण घटना महाड शहरात घडल्यामुळे तक्रार महाड शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली असून तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahad Clashes: Case Filed Against Vikas Gogawale, 20 Others

Web Summary : Following Mahad municipal election day clashes, cross-complaints were filed. Vikas Gogawale and 20 others are booked. Allegations include assault, threats, and robbery during the altercation between two groups, escalating tensions.
टॅग्स :RaigadरायगडLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकCrime Newsगुन्हेगारीMahayutiमहायुती