संरक्षण बंधारा दुरुस्तीसाठी ५०० महिला करणार आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:13 AM2019-05-07T07:13:03+5:302019-05-07T07:13:20+5:30

गेली तीन वर्षे पेण तालुक्यातील माचेल-चिर्बी समुद्र संरक्षक बंधारा उधाणामुळे फुटल्यानंतर परिसरातील ११ गावांतील २७०० एकर भातशेतीत खारे पाणी शिरले.

 500 women's agitation to repair the conservation bund | संरक्षण बंधारा दुरुस्तीसाठी ५०० महिला करणार आंदोलन

संरक्षण बंधारा दुरुस्तीसाठी ५०० महिला करणार आंदोलन

Next

- जयंत धुळप
अलिबाग : गेली तीन वर्षे पेण तालुक्यातील माचेल-चिर्बी समुद्र संरक्षक बंधारा उधाणामुळे फुटल्यानंतर परिसरातील ११ गावांतील २७०० एकर भातशेतीत खारे पाणी शिरले. त्यामुळे भातशेती नापीक झाली असून बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात शासन अपयशी ठरले आहे. एक-दोन स्थानिक शेतकरी व जेएसडब्ल्यू कंपनीमुळे २७०० एकर भातशेती नापीक होऊन ५०० च्यावर शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.
बाधित ११ गावांतील ५०० शेतकरी महिलांनी फुटलेल्या माचेल-चिर्बी संरक्षक बंधाºयात उभे राहून खारे पाणी रोखण्याचे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे लेखी निवेदन अकरा गाव जमीन बचाव संघर्ष कृती समितीने रायगडचे उप जिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांना सोमवारी दिल्याची माहिती कष्टकरी महिला आघाडीच्या प्रमुख मंजुळा पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर व खार डोंगर मेहनत आघाडीचे प्रमुख पांडुरंग तुरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
आनंदनगर, देवळी, जुईहब्बास, खारपाले, पाले, म्हैसवाड, ढोबी, जांभेला, माचेला, चिर्बी, खारघाट या अकरा गावांतील महिला शेतकऱ्यांनी भातशेतीमध्ये घुसणारे खारे पाणी रोखण्याकरिता आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणात आतापर्यंत शेतीसाठी कोणी आत्मदहन केलेले नाही. मात्र आम्हा अकरा गावांवर शासनाच्या नाकर्तेपणामुळे हा प्रसंग ओढावल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत विविध शेतकरी संघटनांनी अनेक निवेदने शासनास दिली. शिष्टमंडळांनी मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, पेण प्रांत कार्यालयात बैठका झाल्या, रास्ता रोको आंदोलन व उपोषण आंदोलने केली. त्यावेळी पेण प्रांत कार्यालयाने व खारभूमी खात्याने अनेक आश्वासने दिली, मात्र बंधाºयाची दुरुस्ती झाली नाही.

निवासी उप जिल्हाधिका-यांचा सुवर्णमध्य

रायगडच्या निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी निवेदन देण्यास आलेल्या महिलांच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली. खारलॅन्ड विभागास बंधाºयाचे दुरुस्ती काम करण्यास तत्काळ आदेश देण्यात येतील. तसेच गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांना विनंती करण्यात येईल, असा सुवर्णमध्य बैनाडे यांनी काढला.

पावसाळ््याला फक्त २५ दिवस राहिलेले आहेत. तोपर्यंत खारभूमी खात्याने काम पूर्ण केले नाही तर २७०० एकरापुढील आणखी १५०० एकर भातशेतीत खारे पाणी घुसण्याचा धोका आहे. परिणामी गडब ते कासूपर्यंतच्या परिसरातील ५००० एकर क्षेत्रात पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Web Title:  500 women's agitation to repair the conservation bund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड