शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

आंबा शेतकऱ्यांना ४५ लाखांची मदत

By admin | Updated: October 14, 2015 02:52 IST

फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये संपूर्ण महाड तालुक्यात अवेळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामध्ये शेतकऱ्यांचा आंबा व कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते

दासगाव : फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये संपूर्ण महाड तालुक्यात अवेळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामध्ये शेतकऱ्यांचा आंबा व कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई महाड तालुक्यासाठी ३ कोटी ६५ लाख २० हजार ५३३ रुपये आली होती. या रकमेमधून ४८९ शेतकऱ्यांना एका महिन्यात ४५ लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती महाड तहसीलदारांनी दिली.२८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत महाड तालुक्यात अवेळी आलेल्या पावसाने ७,४७४ शेतकऱ्यांचे आंबा पिकाचे व कडधान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. पंचनाम्यानंतर तातडीने शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३ कोटी ६५ लाख २० हजार ५३३ रुपये एवढी मदत जाहीर केली. त्याप्रमाणे महाड तहसील कार्यालयात जमाही झाली. महाड तहसील कार्यालयाकडून आजपर्यंत आंबा नुकसानदार ४८९ शेतकऱ्यांच्या खात्यात ४५ लाख २२ हजार १७५ रुपये एका महिन्याच्या आत जमा करण्यात आल्याची माहिती महाड तहसीलदार संदीप कदम यांनी दिली तसेच उर्वरित आंबा नुकसान शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा करून भरपाईचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.जवळपास ४,७७४ शेतकऱ्यांच्या कडधान्याचे नुकसान झाले आहे. या कडधान्य नुकसान शेतकऱ्यांची यादी महाड तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष टी. एस. देशमुख व सचिव खेडेकर यांच्याकडू घेऊन संघटनेमार्फत या शेतकऱ्यांची लागणारी कागदपत्रे जमा करणार असून लवकर पैसे कसे मिळेतील यासाठी प्रयत्न करू असे तहसीलदार कदम यांनी सांगितले. (वार्ताहर)