शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळेची चंद्रभरारी..! ११ विद्यार्थिनींची नावे नासाच्या चंद्र मोहिमेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 09:59 IST

खालुंब्रेच्या लेकींची थेट चंद्रवारी..! जिल्हा परिषद शाळेतील ११ विद्यार्थिनी व ११ शिक्षकांची नावे नासाच्या आर्टेमिस–२ मोहिमेत झळकणार

चाकण : जिल्हा परिषद शाळा, खालुंब्रे (ता. खेड) येथील विद्यार्थिनींनी अवकाशभरारी घेत शिक्षणाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा क्षण अनुभवला आहे. या शाळेतील ११ विद्यार्थिनी आणि ११ शिक्षकांची नावे थेट चंद्रापर्यंत पोहोचणार असून, नासा या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेच्या आर्टेमिस–२ प्रकल्पांतर्गत ही नावे एसडी कार्डमध्ये संग्रहित करून ओरियन अंतराळयानाद्वारे चंद्राभोवतीच्या मोहिमेत पाठवली जाणार आहेत. या अनोख्या उपक्रमासाठी विद्यार्थिनींना नासाकडून थेट ‘बोर्डिंग पास’ देण्यात आले आहेत.

हा गौरवपूर्ण क्षण घडवून आणण्यात मायक्रोसॉफ्ट पुरस्कारप्राप्त शिक्षक नागनाथ विभुते यांचा मोलाचा पुढाकार ठरला आहे. नासा सध्या राबवत असलेला आर्टेमिस–२ प्रकल्प मानवी चंद्रमोहिमांच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या मोहिमेत नासाचे अंतराळवीर रीड वाईझमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच तसेच कॅनेडियन स्पेस एजन्सीचे जेरेमी हॅन्सन हे एसएलएस (स्पेस लॉन्च सिस्टम) रॉकेट आणि ओरियन अंतराळयानातून अवकाशात झेप घेणार आहेत.

दरम्यान, नागनाथ विभुते यांच्या पुढाकारातून शाळेत खालुंब्रे ॲस्ट्रॉनॉमी क्लबची स्थापना करण्यात आली असून, या माध्यमातून नासाच्या सेवानिवृत्त व भारतीय वंशाच्या संशोधिका सुनीता विल्यम्स यांच्याशी विद्यार्थ्यांची वर्च्युअल भेट घडवून आणण्याचा मानस आहे.

या विद्यार्थिनींची नावे जाणार चंद्रावर :

अनुष्का गायकवाड, अर्णवी जिडगुले, वैष्णवी रवींद्र पवार, दीक्षा कांबळे, गायत्री कांबळे, काव्या पवार, पूजा रूपनर, प्रिया बोत्रे, पूर्वी आघाव, वैष्णवी जितेंद्र पवार.

 

या शिक्षकांची नावे चंद्रावर

जगदीश बैरागी, छाया महाजन, प्रभावती बैरागी, रत्नप्रभा वाळुंज, ललिता पवार, स्वाती कुदरी, हरिदास भांगरे, उमा पाटील, दीपाली विभुते, नागनाथ विभुते, विभावरी खोसे.

१० दिवसांची मोहीम

नासा कृत आर्टेमिस–२ ही अंदाजे १० दिवसांची मोहीम एप्रिल २०२६ पूर्वी फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होणार आहे. अंतराळवीर चंद्राच्या पलीकडे सुमारे ४,६०० मैलांचा प्रवास करून सॅन दिएगोच्या किनाऱ्याजवळील पॅसिफिक महासागरात सुरक्षित उतरणार आहेत. एकीकडे जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या घटत असताना, मुलींच्या शिक्षणाला अवकाशाची दिशा देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. या उल्लेखनीय कार्याचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले आणि केंद्रप्रमुख सुषमा जाधव यांनी विशेष कौतुक केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Schoolgirls' Lunar Leap: Names on NASA's Moon Mission!

Web Summary : Eleven Maharashtra schoolgirls and teachers' names will journey to the moon aboard NASA's Artemis-2 mission. Their names are stored on an SD card within the Orion spacecraft. Teacher Nagnath Vibhute initiated this effort, connecting students with space exploration.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रNASAनासा