Zilla Parishad Election 2026: मुळशी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 11:13 IST2026-02-03T11:13:08+5:302026-02-03T11:13:25+5:30

ZP Election 2026:पंचायत समितीच्या एकूण सहा जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

Zilla Parishad Election The battle for Zilla Parishad and Panchayat Samiti elections has begun in Mulshi taluka. | Zilla Parishad Election 2026: मुळशी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू

Zilla Parishad Election 2026: मुळशी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू

पिरंगुट : मुळशी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे तीन व पंचायत समितींच्या सहा जागांसाठी मतदान होणार असल्याने प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. यात जिल्हा परिषदेच्या तीन जागांसाठी एकूण १८ उमेदवार तर पंचायत समितीच्या एकूण सहा जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

जिल्हा परिषदेचे तीन गट

जिल्हा परिषदेच्या असलेल्या पिरंगुट-भूगाव गटामध्ये एकूण ५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तसेच पौड-अंबडवेट जिल्हा परिषद गटामध्ये एकूण ६, तर माण-हिंजवडी जिल्हा परिषद गटामध्ये एकूण ७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. केवळ तीन जागांसाठी एकूण १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत.

पंचायत समितीचे सहा गट

पंचायत समितीच्या असलेल्या पिरंगुट गणात ६ व भूगाव गणात ६ उमेदवार रिंगणात आहेत. तसेच पौड गणात ६ व अंबडवेट गणात ४ उमेदवार रिंगणात आहेत. माण गणात ६ व हिंजवडी गणात ५ उमेदवार रिंगणात आहेत. म्हणजेच पंचायत समितीच्या एकूण सहा जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणामध्ये निवडणूक लढवीत आहेत. विशेष बाब म्हणजे मुळशी तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींचे उमेदवार हे आमने-सामने निवडणूक लढवित आहेत.

Web Title : मुळशी तालुका जिला परिषद, पंचायत समिति चुनाव तेज

Web Summary : मुळशी तालुका में जिला परिषद और पंचायत समिति चुनावों के लिए प्रचार तेज हो गया है। तीन जिला परिषद सीटों के लिए 18 उम्मीदवार और छह पंचायत समिति सीटों के लिए 33 उम्मीदवार मैदान में हैं। चुनाव में राष्‍ट्रवादी कांग्रेस पार्टी के दोनों गुट आमने-सामने हैं।

Web Title : Mulshi Taluka Zilla Parishad, Panchayat Samiti Elections Heat Up

Web Summary : Mulshi Taluka witnesses intense campaigning for Zilla Parishad and Panchayat Samiti elections. 18 candidates compete for three Zilla Parishad seats, while 33 contest six Panchayat Samiti seats. Both factions of the NCP face each other in the election.