शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

युवा संसदेचे शनिवारी उद्घाटन

By admin | Updated: January 25, 2017 02:27 IST

नऱ्हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे आयोजित दुसऱ्या युवा संसदेचे उद्घाटन येत्या शनिवारी

पुणे : नऱ्हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे आयोजित दुसऱ्या युवा संसदेचे उद्घाटन येत्या शनिवारी (दि. २८) सकाळी १० वाजता होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या युवा संसदेत युवकांना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे, असे युवा संसदेचे संस्थापक-अध्यक्ष शार्दूल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.संसदेचे उद््घाटन माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाला खासदार राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत. असे नमूद करून शार्दूल जाधवर म्हणाले, ‘‘कार्यक्रमात छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांना आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार, तसेच रक्षा खडसे व डॉ. प्रीतम मुंडे यांना आदर्श खासदार पुरस्कार, भीमराव तापकीर यांना आदर्श आमदार पुरस्कार, कांताताई दगडी यांना आदर्श सरपंच पुरस्कार तसेच प्रवीण निकम यांना आदर्श युवा पुरस्कार दिला जाणार आहे.’’महाराष्ट्रासह गोवा, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड विविध राज्यांतून सुमारे २ हजार युवक संसदेसाठी पुण्यात येणार आहेत. त्यांना ‘सामाजिक चळवळ आणि युवक’, ‘अभिव्यक्ती- देशभक्ती आणि देशद्रोह’, ‘राजकारण आणि नैतिकता’ या विषयावर विविध क्षेत्रांतील वक्ते मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, दहशतवाद विरोधी पथकाचे भानुप्रताप बर्गे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार विनायक मेटे, नेहरू युवा संघटनेचे संचालक मेजर जनरल दिलावर सिंग आदी मनोगत व्यक्त करणार आहेत, असेही जाधवर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)