धक्कादायक! कुत्रा आईच्या अंगावर भुंकला, चौघा जणांची तरुणीला बेदम मारहाण; कोथरुडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 14:38 IST2021-07-26T14:35:46+5:302021-07-26T14:38:42+5:30

फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहण्यास आहेत.

The youth girl beaten by four people due to dog barking on a mother; Incidents in Kothrud | धक्कादायक! कुत्रा आईच्या अंगावर भुंकला, चौघा जणांची तरुणीला बेदम मारहाण; कोथरुडमधील घटना

धक्कादायक! कुत्रा आईच्या अंगावर भुंकला, चौघा जणांची तरुणीला बेदम मारहाण; कोथरुडमधील घटना

पुणे : तरुणीने ज्या कुत्र्याला खायला टाकले, तो आईवर भुंकल्याने चिडलेल्या चौघा जणांनी या तरुणीला बेदम मारहाण करुन जखमी केले. कोथरुड पोलिसांनी या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

राजाराम मारुती चौधरी, त्यांची आई मालुबाई चौधरी, पत्नी बायडा राजाराम चौधरी आणि मंदाकिनी चौधरी (सर्व रा. म्हातोबानगर, कोथरुड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी निशा पंडित थरकुडे (वय ४०, रा. म्हातोबानगर, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहण्यास आहेत. फिर्यादी यांनी ३० डिसेंबर २०२० रोजी रात्री पावणे अकरा च्या सुमारास एका कुत्र्याला खायला टाकले होते. ते कुत्रे राजाराम चौधरी यांच्या आईच्या अंगावर भुंकले. या कारणावरुन आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन डाव्या हाताची करंगळी पकडून जाेरात वाकवून त्यांना जबर दुखापत केली. त्यामुळे फिर्यादींचे शारिरीक व आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांनी हा प्रकार घडला तेव्हा कोथरुड पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रारीची चौकशी व्हावी, यासाठी त्यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. त्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत

Web Title: The youth girl beaten by four people due to dog barking on a mother; Incidents in Kothrud