पुण्यातील आत्महत्येचे सत्र सुरूच; गळफास घेत तरुणाची आत्महत्या; धायरी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 10:27 IST2020-07-10T10:26:09+5:302020-07-10T10:27:55+5:30

आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट

Youth committed sucide in dhayari | पुण्यातील आत्महत्येचे सत्र सुरूच; गळफास घेत तरुणाची आत्महत्या; धायरी येथील घटना

पुण्यातील आत्महत्येचे सत्र सुरूच; गळफास घेत तरुणाची आत्महत्या; धायरी येथील घटना

पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.९) रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.

विनायक जालिंदर बंडगर (वय:२३ वर्षे, रायकर मळा, धायरी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायकला दारूचे व्यसन होते. त्याचे आई वडील हे किराणा मालाचे दुकान चालवत असून गुरुवारी सायंकाळी तो मित्रांबरोबर बाहेर गेला होता. रात्री आठच्या सुमारास तो परत घरी आला त्यावेळी आई वडील दुकानात होते.  
 रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्याची आई घरी गेली. त्यावेळी त्यांनी बाहेरून दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने शेजारील नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्याने पंख्याला कपड्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. अज्ञात कारणावरून त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार अशोक कदम करीत आहे. 

Web Title: Youth committed sucide in dhayari