Suicide In Indapur: इंदापूरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 15:43 IST2022-02-21T15:43:14+5:302022-02-21T15:43:28+5:30
युवकाने रात्रीच्या वेळी राहत्या घरात दोरीने गळफास घेतल्याची घटना घडली आहे

Suicide In Indapur: इंदापूरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
इंदापूर : इंदापूर शहर नगरपरिषद हद्दीतील युवकाने रात्रीच्या वेळी राहत्या घरात दोरीने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. चेतन गणपत चौगुले ( रा. वडारगल्ली,शासकीय गोडाउनजवळ, इंदापूर) असे आत्महत्या करणार्याचे नाव आहे. याबाबत सुहास गणपत चौगुले(वय २९, रा.वडारगल्ली इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास चौगुले आणि चेतन चौगुले हे भाऊ असून ते सर्वजण एकत्र रहात होते. घरातील सर्वजण १९ तारखेला जेवण केल्यानंतर रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास आपआपल्या खोलीत झोपायला गेले. चेतन दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजले तरी झोपेतुन उठला नव्हता. म्ह्णून भाऊ आणि आई त्याला उठवण्यासाठी गेले. दरवाजा वाजवूनही चेतनकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दरवाजा जोरात ढकलुन उघडला. तर स्लॅबच्या घराच्या लोंखडी हुकास चेतनने पांढर्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. उपचारासाठी उपजिल्हा रूग्णांलयामध्ये दाखल केले असता डाॅक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.