पुणे : फटाके वाजवताना झालेल्या वादातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कोरेगाव पार्क भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. ओंकार बसूराज कोळी (२६) आणि शुभम बसूराज कोळी (२६, दोघे रा. दरवडे मळा, कोरेगाव पार्क) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (दि. २१) तक्रारदार तरुण आणि मित्र रात्री साडेनऊच्या सुमारास घरासमोर थांबले होते. त्यावेळी आरोपी ओंकार आणि त्याचा भाऊ शुभम घरासमोर फटाके वाजवत होते. फटाके वाजवण्यावरून त्यांच्यात वाद झाला. आरोपी कोळी यांंनी तक्रारदार तरुण, त्याची आई आणि मित्राला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यानंतर आरोपींनी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींना पोलिसांनी अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक हंडाळ पुढील तपास करत आहेत.
वैमनस्यातून तरुणावर वार...
वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना येरवडा परिसरात घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. प्रेम विकी ससाणे (१९, रा. यशवंतनगर, येरवडा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (दि. २१) रात्री साडेअकराच्या सुमारास यशवंतनगर भागात थांबला होता. त्यावेळी वैमनस्यातून आरोपी ससाणे आणि साथीदारांनी त्याला शिवीगाळ करून त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पोलिस कर्मचारी कायगुडे पुढील तपास करत आहेत.
Web Summary : A youth was stabbed in Koregaon Park after a dispute over fireworks. Police arrested two individuals. Separately, in Yerwada, a young man was attacked with a sharp weapon due to prior animosity; one arrested, two booked. Incidents occurred on Lakshmi Pujan.
Web Summary : कोरेगांव पार्क में पटाखों को लेकर विवाद के बाद एक युवक पर चाकू से हमला किया गया। पुलिस ने दो लोगों को गिरफ्तार किया। अलग से, येरवदा में, पुरानी दुश्मनी के चलते एक युवक पर धारदार हथियार से हमला; एक गिरफ्तार, दो पर मामला दर्ज। घटनाएं लक्ष्मी पूजन पर हुईं।