शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"तुमच्या नवऱ्याला उचललंय, २ करोड तयार ठेवा..", पुण्यातून दिवसाढवळ्या हिरे व्यापाऱ्याचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 09:25 IST

व्यापाऱ्याने जास्तीचा परतावा देतो असे सांगून त्यांनी अनेकांकडून पैसे घेतल्याचेही समोर आले आहे

किरण शिंदे

पुणे: दोन करोड रुपयांसाठी पुणे शहरातून एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले. बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.  सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अपहरण झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिऱ्याचे व्यापारी हिरे घेऊन त्यापासून दागिने तयार करण्याचे काम करतात. सोमवारी सायंकाळी पती-पत्नी मुलीला शाळेतून आणण्यासाठी सॅलिस्बरी पार्क परिसरात गेले होते. शाळेतून घेतल्यानंतर त्यांनी मुलाला पत्नीच्या ताब्यात सोपवले आणि काही कामानिमित्त कॅम्पात जात असल्याचे सांगून निघून गेले. 

दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या मोबाईलवर व्यापारी यांच्या मोबाईल वरून फोन आला. समोरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तीने "मैने आपके पति को उठाया है, दो करोड तयार रखो, आपके ससुर जी को बोलो, दो घंटे मे फोन करेंगे" असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या फिर्यादीच्या पतीने तातडीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त मनोज कुमार पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, निखिल पिंगळे, विवेक मासाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. 

तपासा दरम्यान त्यांचे शेवटचे लोकेशन नवले पूल परिसरात आढळून आले आहे. याशिवाय तिथं हे वापरत असलेली दुचाकी देखील त्याच परिसरात आढळली आहे. त्यानुसार पोलीस आता त्या घटनेचा तपास करत आहेत. तर दुसरीकडे हिरे व्यापारी  हे मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटात असल्याची ही माहिती समोर आली आहे. याशिवाय जास्तीचा परतावा देतो असे सांगून त्यांनी अनेकांकडून पैसे घेतल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या अपहरण प्रकरणामागे आणखी दुसरी काही बाजू आहे का याचा देखील तपास पुणे पोलीस घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेBibvewadiबिबवेवाडीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकjewelleryदागिनेGoldसोनंbusinessव्यवसायMONEYपैसा