The young woman was lured into marriage and then murdered | तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवले, त्यानंतर केला खून

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवले, त्यानंतर केला खून

ठळक मुद्देपरप्रांतात खून केल्याची नातेवाईकांची तक्रार

पिंपरी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला उत्तर प्रदेश येथे पळवून नेले. त्यानंतर तिचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली असावी किंवा तिला विकले असावे, अशी तक्रार तरुणीच्या नातेवाईकांनी केली आहे. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उर्मिला सहाबसिंह बरार (वय १८, रा. दापोडी), असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. सहाबसिंह पंचमसिंह बरार (वय ४७, रा. उत्तर प्रदेश) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. अरविंद बरार (वय ३०), मनीष (वय २५), ठकुरी (वय ५५, सर्व रा. उत्तर प्रदेश), साधना (रा. दापोडी), कनछिदना ( रा. दापोडी), अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरार यांची मुलगी उर्मिला हिला अरविंद बरार याने लग्न करण्याच्या बहाण्याने फूस लावून पळवून नेले. २६ जानेवारी २०१७ रोजी ही घटना घडली. त्याने उर्मिला दापोडी येथून उत्तर प्रदेश येथे नेले. त्यानंतर आरोपींशी संगणमत करून कोणत्यातरी अज्ञात कारणावरून तरुणीचा खून केला‌. तसेच तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली किंवा तिला कोणत्या तरी व्यक्तिला विकले आहे. अशी तक्रार बरार यांनी उत्तर प्रदेश येथील जालौन जिल्ह्यातील चुर्खी पोलीस ठाण्यात दिली. तरुणीचे भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दापोडी येथून अपहरण झाल्याने हा गुन्हा भोसरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. दरम्यान बरार त्यांच्या मूळ गावी गेले होते. त्यांच्याकडे तपास करून १० एप्रिल २०२१ रोजी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The young woman was lured into marriage and then murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.