लग्नाचे आमिष दाखवून पुणे, मुंबई, नेपाळ आणि थायलंडमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार; २५ लाखही उकळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:33 IST2025-04-08T18:32:50+5:302025-04-08T18:33:04+5:30

घेतलेले पैसे परत देत नाही, तसेच लग्न करण्यासही टाळाटाळ करत असल्याने फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आल्यावर पोलिसात धाव घेतली

Young woman torture and taken to Pune Mumbai Nepal and Thailand on the pretext of marriage Rs 25 lakhs also extorted | लग्नाचे आमिष दाखवून पुणे, मुंबई, नेपाळ आणि थायलंडमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार; २५ लाखही उकळले

लग्नाचे आमिष दाखवून पुणे, मुंबई, नेपाळ आणि थायलंडमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार; २५ लाखही उकळले

पुणे: लग्नाचे आमिष दाखवून पुणे, मुंबई, नेपाळ आणि थायलंडमध्ये नेऊन एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला, तसेच विविध कारणे सांगून पीडितेकडून तब्बल २५ लाख रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी कबीर अहमद खान ऊर्फ कबीर अरोरा (वय ३०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात २५ वर्षीय तरुणीने मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा गुन्हा विश्रांतवाडी पोलिसांकडे वर्ग होऊन आला आहे. अधिक माहितीनुसार, पीडित तरुणी पुण्यात ट्रेनिंगसाठी आली होती. त्यावेळी आरोपी कबीर खान याने तिच्याशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२४ पासून आतापर्यंत पुणे, सांताक्रूझ, मुंबई, नेपाळ, थायलंड व अझर बैझान या ठिकाणी नेऊन पीडितेवर वारंवार बलात्कार केला.

कबीर खान याने बँक खाते जास्त व्यवहारामुळे फ्रीझ झाले आहे, पेमेंट येणार आहे, तत्काळ व्हिजा तयार करायचा आहे, यांसह विविध कारणे सांगून पीडित तरुणीकडून तब्बल २५ लाख रुपये उकळले. कबीर घेतलेले पैसे परत देत नाही, तसेच लग्न करण्यासही टाळाटाळ करत असल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलिसांत धाव घेत कबीर खान याच्याविरोधात मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्ह्याचा संबंध पुण्याशी असल्याने कुरार पोलिसांनी हा गुन्हा विश्रांतवाडी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुडगे करत आहेत.

Web Title: Young woman torture and taken to Pune Mumbai Nepal and Thailand on the pretext of marriage Rs 25 lakhs also extorted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.