व्हिडिओला लाईक, कमेंट केल्यास पैसे मिळवून पडले महागात;तरुणीची दोन लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 21:18 IST2025-06-26T21:15:56+5:302025-06-26T21:18:17+5:30

- व्हिडिओला लाईक, कमेंट केल्यास पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणीला तब्बल दोन लाख रुपयांचा गंडा घातला. ही घटना १२ ते १३ मे रोजी कोंढवा बुद्रुक परिसरात घडली आहे.

Young woman cheated of two lakh rupees by getting money by liking and commenting on videos | व्हिडिओला लाईक, कमेंट केल्यास पैसे मिळवून पडले महागात;तरुणीची दोन लाखांची फसवणूक

व्हिडिओला लाईक, कमेंट केल्यास पैसे मिळवून पडले महागात;तरुणीची दोन लाखांची फसवणूक

पुणे : व्हिडिओला लाईक, कमेंट केल्यास पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणीला तब्बल दोन लाख रुपयांचा गंडा घातला. ही घटना १२ ते १३ मे रोजी कोंढवा बुद्रुक परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी कोंढवा परिसरात राहायला असून, १२ मे रोजी सायबर चोरट्यांनी तिला सोशल मीडिया आयडीवरून मेसेज केला. त्यांच्या कंपनीच्या व्हिडिओला लाईक करण्यास सांगून तरुणीचा विश्वास संपादित केला.

प्रत्येक लाईक आणि कमेंटवर पैसे मिळवून देण्याची बतावणी सायबर चोरट्यांनी तिला केली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरुणीला लिंक पाठवून ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तब्बल दोन लाख रुपयांची फसवणूक झाल्यानंतर तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Young woman cheated of two lakh rupees by getting money by liking and commenting on videos