शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

भोसरीत युवा मतदार ठरणार निर्णायक; २० ते ४० वयोगटातील ३ लाख ६ हजार ८०२ मतदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 09:37 IST

विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. बुधवारी (दि.२०) प्रत्यक्ष मतदान होणार

पिंपरी : विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. बुधवारी (दि.२०) प्रत्यक्ष मतदान होणार आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील २० ते ४० वयोगटातील मतदारांची संख्या ३ लाख ६ हजार ८०२ असून, हे भोसरी मतदारसंघातील आमदार ठरविणार असल्याने युवा मतदार निर्णायक ठरणार आहेत. 

वयोगटानुसार मतदार संख्या
मतदारसंघात १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या १३ हजार ३०७ आहे. यामध्ये ७ हजार ७८३ पुरुष तर ५ हजार ५२३ महिला व अन्य एका मतदाराचा समावेश आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण ६ लाख ८ हजार ४२५ मतदार आहेत. त्यापैकी ३ लाख २८ हजार २८० पुरुष तर २ लाख ८ हजार ४८ महिला तर अन्य ९७ मतदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर, २०१९ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ५६.६१ टक्के मतदान झाले होते. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४९.४१ टक्के मतदान झाले आहे. यंदाच्या विधानसभा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहेत. शहरात चिंचवडमध्ये सर्वाधिक मतदार आहेत. तर त्याखालोखाल भोसरी मतदारसंघामध्ये मतदार आहेत.शंभरी ओलांडलेले २०० हून अधिक मतदारभोसरी विधानसभा मतदारसंघात वयाची शंभरी ओलांडलेले एकूण २१२ मतदार आहेत. यामध्ये १०० ते १०९ वयोगटातील २०८ मतदार आहेत. तर ११० ते ११९ वयोगटातील दोन मतदार आहेत. याशिवाय १२० पेक्षा अधिक वय असलेले एक महिला व एक पुरुष अशा एकूण दोन मतदारांचा समावेश आहे. 

 

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Votingमतदानpimpri-acपिंपरी