कात्रज-कोंढवा रस्त्यावर तरुणावर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:13 IST2021-01-25T04:13:03+5:302021-01-25T04:13:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मित्रांबरोबर दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणावर दुसऱ्या दोन दुचाकीवरुन आलेल्या तरुणाने गोळीबार करुन जबर जखमी केले. ...

Young man shot dead on Katraj-Kondhwa road | कात्रज-कोंढवा रस्त्यावर तरुणावर गोळीबार

कात्रज-कोंढवा रस्त्यावर तरुणावर गोळीबार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मित्रांबरोबर दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणावर दुसऱ्या दोन दुचाकीवरुन आलेल्या तरुणाने गोळीबार करुन जबर जखमी केले. कात्रज-कोंढवा रस्त्यावर आरएमडी शाळेसमोर मध्यरात्री घडला. विघ्नेश अशोक गोरे (वय २०, रा. एसआरए इमारत, लेकटाऊन, कात्रज) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोरे याच्या मांडीला गोळी चाटून गेल्याने त्याला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. याबाबत त्याने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

गोरे हा त्याचे अतुल दरेकर, ईश्वर म्हस्के आणि एक मित्र वेगवेगळ्या दुचाकीवरुन मध्यरात्री बाराच्या सुमारास कात्रज -कोंढवा रस्त्यावरुन दुचाकीवरुन जात होते. आरएमडी शाळेसमोर ते आले असताना त्यांच्या पाठीमागून स्पोर्ट्स बाईकवरुन आलेल्या हल्लेखोराने पिस्तुलातून गोळीबार केला. ती गोरे याच्या मांडीला लागली. त्यानंतर ते त्यांचा पाठलाग करीत होते. हे पाहून गोरे याचा मित्र अतुल दरेकर याने मोटारसायकल वेगाने खडीमशीन पोलीस चौकीत नेली. हे पाहून हल्लेखोर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक दादाराजे पवार, चेतन मोरे, उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

वैमनस्यातून गोरेवर गोळीबार करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Young man shot dead on Katraj-Kondhwa road