युवा उद्योजक पुरस्कार शेळके यांना जाहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:10 IST2020-12-08T04:10:40+5:302020-12-08T04:10:40+5:30

पुरस्कारासाठी SBI General Insurance व ''''टाइम्स नेटवर्क'''' च्या माध्यमातून विशेष मुलाखती, सर्व्हे, उत्तम व्यवस्थापन व दर्जेदार सेवा तसेच विशिष्ट ...

Young Entrepreneur Award announced to Shelke | युवा उद्योजक पुरस्कार शेळके यांना जाहिर

युवा उद्योजक पुरस्कार शेळके यांना जाहिर

पुरस्कारासाठी SBI General Insurance व ''''टाइम्स नेटवर्क'''' च्या माध्यमातून विशेष मुलाखती, सर्व्हे, उत्तम व्यवस्थापन व दर्जेदार सेवा तसेच विशिष्ट क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला जातो. देशभरातील शेकडो व्यक्तींची व समूहाची नामांकन प्राप्त झाल्यानंतर अंतिम छाननी केली जाते.

शनिवारी या पुरस्कारासाठी देशातील ५ व्यक्तींचे मानांकन करण्यात आलेले होते. त्यामध्ये समर्थ शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.समर्थ शैक्षणिक संकुल येथे उभारलेल्या संस्थेमार्फत शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या अभिनव कल्पनांच्या माध्यमातून उल्लेखनीय,गुणवत्तापूर्ण,नाविन्यपूर्ण व दर्जेदार शैक्षणिक कार्यामुळे हा पुरस्कार देण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.राष्ट्रीय स्तरावर यंदाचा नव उद्योजक म्हणून मिळालेला हा बहुमान समर्थ संकुल व संस्थेसाठी एक मनाचा तुरा असून समाजातील विविध स्तरातून वल्लभ शेळके या युवा उद्योज कावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके व सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Young Entrepreneur Award announced to Shelke