पुण्यातील मेडिकल कॉलेजमधील लज्जास्पद प्रकार; नराधमाने महिलेच्या...,

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 11:09 IST2022-05-24T10:31:31+5:302022-05-24T11:09:06+5:30

रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला

young doctor slapped on back by person at the gate of bj medical college in pune | पुण्यातील मेडिकल कॉलेजमधील लज्जास्पद प्रकार; नराधमाने महिलेच्या...,

पुण्यातील मेडिकल कॉलेजमधील लज्जास्पद प्रकार; नराधमाने महिलेच्या...,

पुणेपुण्यातील प्रसिद्ध बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर 29 वर्षीय डॉक्टर तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही तरुणी प्रवेशद्वारावरून जात असताना
दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांच्या पार्श्वभागावर चापट मारली आणि पळून गेला. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. डॉक्टर तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर बंडगार्डन पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी हे डॉक्टर आहेत. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्या बीजे महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरून जात असतानाच अज्ञात आरोपी दुचाकीवरून त्या ठिकाणी आला. आणि काही समजण्याच्या आत त्याने डॉक्टर तरुणीच्या कमरेखाली जोराची चापट मारली. अचानक घडलेल्या या प्रकाराने फिर्यादी घाबरल्या. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

बंडगार्डन पोलिसांनी तात्काळ अनोळखी आरोपीविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: young doctor slapped on back by person at the gate of bj medical college in pune