'तुम्ही खूप हॉट दिसता', अल्पवयीन मुलींची छेडछाड; दोघांना ठोकल्या बेड्या

By नितीश गोवंडे | Updated: January 4, 2024 14:28 IST2024-01-04T14:27:55+5:302024-01-04T14:28:57+5:30

एका अल्पवयीन मुलीच्या खांद्याला व अंगाला हात लावून तीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले

You look so hot teasing of underage girls Both of them were shackled | 'तुम्ही खूप हॉट दिसता', अल्पवयीन मुलींची छेडछाड; दोघांना ठोकल्या बेड्या

'तुम्ही खूप हॉट दिसता', अल्पवयीन मुलींची छेडछाड; दोघांना ठोकल्या बेड्या

पुणे: शहरात दिवसेंदिवस महिला छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मार्केटयार्ड परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना बघून दोघांनी छेड काढल्याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २ जानेवारी रोजी संध्याका‌ळी पावणे सहाच्या सुमारास दोन अल्पवयीन मुली मार्केटयार्ड परिसरातून जात होत्या. त्यावेळी मानव संदीप अडागळे (२०, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केटयार्ड) आणि आकाश दादा सोनवणे (२६) यांनी मुलींना ‘तुम्ही दोघी खूप छान दिसता, सेक्सी हॉट दिसता, तुम्ही आम्हाला आवडता’ असे म्हणत एका अल्पवयीन मुलीच्या खांद्याला व अंगाला हात लावून तीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील या करत आहेत.

 

Web Title: You look so hot teasing of underage girls Both of them were shackled