'तू कुत्र्यांना खाऊ घालते, ती आमच्या घरासमोर येऊन घाण करतात' दोन कुटुंबात हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 15:22 IST2022-01-09T15:21:50+5:302022-01-09T15:22:02+5:30

पुण्यातील चंदननगर पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील ७ जणांवर गुन्हा दाखल

You feed the dogs they come in front of our house and make it dirty Two families fight in pune | 'तू कुत्र्यांना खाऊ घालते, ती आमच्या घरासमोर येऊन घाण करतात' दोन कुटुंबात हाणामारी

'तू कुत्र्यांना खाऊ घालते, ती आमच्या घरासमोर येऊन घाण करतात' दोन कुटुंबात हाणामारी

पुणे : शेजारी राहणाऱ्या महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यात गळ्यातील चैन गहाळ झाली. चंदननगर पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील ७ जणांवर गुन्हा दाखल केला. हे सर्व घडले ते भटक्या कुत्र्यांना एका महिला खायला घालते. त्यामुळे ही कुत्री येऊन घरासमोर घाण करतात, या कारणावरुन भांडणे झाली होती. 

याप्रकरणी दिप्ती राऊत (वय ३५, रा. अनुसया पार्क, खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी श्र्वेता उज्वल थोरात (वय ३७) आणि तृप्ती सूर्यकांत माने (रा. अनुसया पार्क, खराडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ७ जानेवारी रोजी सायंकाळी पावणेआठ वाजता घडला. फिर्यादी या घराजवळ भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी गेल्या. यावेळी श्र्वेता थोरात तेथे आल्या व त्यांनी तू या भटक्या कुत्र्यांना खाऊ घालते, ती कुत्री आमच्या दारात येऊन घाण करतात. तू त्या कुत्र्यांना खाऊ घालणे बंद कर, असे म्हणून तिने हातातील दगड फेकून फिर्यादी यांच्या पाठीवर जोरात मारला. शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिची बहीण तृप्ती माने हिनेही फिर्यादी यांना मारहाण करुन धमकी दिली.

त्याविरोधात श्र्वेता उज्वल थोरात यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दिप्ती दिलीप राऊत, पुष्पा दिलीप राऊत, दीपक राऊत व दीपक राऊतची पत्नी, संतोष खाटोड अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फियार्दी या त्यांच्या किराणा दुकानात जात असताना त्यांच्या शेजारी राहणारी दिप्ती राऊत हिने तु आमच्या विरोधात पोलीस तक्रार का केली, असे म्हणून शिवीगाळ करुन तिने फिर्यादीची गचांडी पकडून गळ्यातील दोन तोळ्याची चैन ओढून तोडून टाकली. लाकडी काठीने फिर्यादीचे छातीवर, पोटावर, कमरेवर मारहाण करुन दगडाने मारुन हात पाय तोडून टाकेल अशी धमकी दिली. पुष्पा राऊत हिने फियार्दीचे केस ओढून कपडे फाडले. दीपक राऊत याने फियार्दीचे छातीवर बुक्की मारली. संतोष खाटोड याने फिर्यादींना शिवीगाळ करुन दगडाने ठेचून मार अशी धमकी दिली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक ढवळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: You feed the dogs they come in front of our house and make it dirty Two families fight in pune