'तु स्लो आहेस, डोळे छोटे आहेत', सासरच्यांकडून त्रास, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:22 IST2025-11-06T15:21:22+5:302025-11-06T15:22:07+5:30

पत्नीला घटस्फोट घ्यायचा असे सांगून तिच्या गळ्यातील दीड तोळयाचे सोन्याचे मंगळसुत्र, कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेऊन गेले

You are slow your eyes are small harassment from in laws married woman takes extreme step | 'तु स्लो आहेस, डोळे छोटे आहेत', सासरच्यांकडून त्रास, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

'तु स्लो आहेस, डोळे छोटे आहेत', सासरच्यांकडून त्रास, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

पुणे: कौटुंबिक कारणावरून विवाहितेचा शारीरिक छळ करुन घटस्फोट देण्यासाठी मानसिक दबाव आणला. त्यामुळे विवाहितेने फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलिसांनी पती, सासु, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दिशा निलेश शहा (२५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत हीतश्री संदेश शहा (५७, रा. सोमजी हाईटस, श्रद्धानगर, कोंढवा) यांनी

कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पती निलेश शहा, सासू संगीता शहा, दीर प्रशांत शहा (तिघे रा. भुगाव) आणि नणंद ममता व्होरा (रा. नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा हिचा निलेश दिलीप शहा (३०, रा. माऊंट ब्लेएर सोसायटी, भुगाव) याच्याबरोबर जैन समाजातील रुढी परंपरानुसार २० डिसेंबर २०२४ रोजी विवाह झाला. निलेश शहा हा खासगी नोकरी करतो. त्याने लग्न झाल्यानंतर दिशा हिला नोकरी सोडायला लावली. विवाह झाल्यानंतर तिला सर्वजण त्रास देत होते. तु स्लो आहेस, तुला संसार जमत नाही. तसेच तुझे डोळे छोटे आहेत, असे बोलून तिला त्रास देत करत. दिशा हिला स्वयंपाक करायला लावायचे मात्र, तिने बनवलेले कोणीही खात नसे, अशा प्रकारे तिचा मानसिक छळ करत होते. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पती निलेश शहा, संगीता शहा, ममता व्होरा हे दिशाला घेऊन तिच्या माहेरी आले. ममता व्होरा फिर्यादींना म्हणाली की, दिशाच लग्न का केलं. निलेश बोलला की तिला प्रपंच जमणार नाही, असे बोलून तिला माहेरी सोडून निघून गेले. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी निलेश व संगीता शहा हे तिचे कपडे घेऊन आले. त्यावेळी निलेश याने दिशापासून घटस्फोट घ्यायचा आहे. त्या दोघांनी दिशासोबत वाद घालून तिच्या गळ्यातील दीड तोळयाचे सोन्याचे मंगळसुत्र, कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेऊन गेले. त्यामुळे दिशा मानसिक तणावात होती. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास फिर्यादी या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. तेथून थोड्या वेळात परत आल्यावर दिशा हिने हॉलमधील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्याबाबतचे धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर आता हितश्री शहा यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे पुढील तपास करत आहेत.

 

Web Title : शारीरिक प्रताड़ना से तंग आकर पुणे में महिला ने आत्महत्या की।

Web Summary : पुणे की दिशा शाह ने ससुराल वालों द्वारा 'सुस्त' कहने और रंग-रूप को लेकर प्रताड़ित करने से तंग आकर आत्महत्या कर ली। पति और ससुराल वाले आत्महत्या के लिए उकसाने के आरोप में गिरफ्तार।

Web Title : Harassment over appearance, Pune woman commits suicide due to family dispute.

Web Summary : Pune woman, Disha Shah, commits suicide due to harassment from in-laws for being 'slow' and appearance shaming. Husband, in-laws booked for abetment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.