विवेक भुसेपुणे : पहाटे तीन वाजता हडपसर पोलीस ठाण्यातील फोन खणखणतो, आपण मुंबईतून बोलत असून मांजरी येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधील सीसीटीव्हीला एक जण चिखल लावत आहे. चोरी होण्याची शक्यता आहे ही माहिती मिळाल्याबरोबर मांजरी भागात गस्तीवर असलेले मार्शल आकाश गायकवाड, सचिन कांबळे तातडीने शोध घेऊ लागतात. काही वेळातच घुले शाळेजवळील एका एटीएममध्ये एक चोरटा एटीएम मशीनचा दरवाजा तोडून मशीन उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले.पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. गेल्या काही महिन्यात पुणे, पिंपरी, तसेच पुणे जिल्हा, नाशिक येथे चोरटे अख्खे एटीएम मशीन उचकटून नेत असल्याचे आढळून आले आहे. यातील काही टोळ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.अनेक ठिकाणी एटीएम मशीनचे शटर अर्धवट बंद असल्याचे ग्राहकांकडून समजल्यावर तेथे चोरी झाल्याचे बँकांना समजल्याची अनेक प्रकरणे दिसून आली आहेत. अशावेळी मांजरीमधील एटीएमची चोरी सेन्सर प्रणालीद्वारे व्हिजिलन्स ठेवल्याने ही चोरी रोखता आली आहे.
होय, एटीएममधील चोऱ्या रोखणे आहे शक्य! पुण्यात आला प्रत्यय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 12:19 IST
गेल्या काही महिन्यात पुणे, पिंपरी, तसेच पुणे जिल्हा, नाशिक येथे चोरटे अख्खे एटीएम मशीन उचकटून नेत असल्याचे आढळून आले आहे़..
होय, एटीएममधील चोऱ्या रोखणे आहे शक्य! पुण्यात आला प्रत्यय
ठळक मुद्देमांजरीमधील एटीएमची चोरी सेन्सर प्रणालीद्वारे व्हिजिलन्स ठेवल्याने रोखता आली ही चोरी