शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

यंदा झेंडूच्या फुलांना पन्नास टक्क्यांनी कमी भाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 5:11 PM

दस-या निमित्ताने झेंडूच्या फुलांनी घराची सजावट केली जाते. त्याचप्रमाणे दुचाकी,चार चाकी वाहनांना फुलांच्या माळा घातल्या जातात. तसेच पूजेसाठीही फुलांचा वापर केला जातो. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत फुलांना यंदा ५० टक्क्यांनी कमी भाव मिळाला आहे.

ठळक मुद्देमागणीच्या तुलनेत झेंडूची आवक झाल्याने फुलांना ४० ते ५० रुपये दरदस-याला मोठ्या आकाराच्या झेंडूला अधिक मागणी दिवाळीला झेंडूच्या दरात वाढ होण्याची शक्यता

पुणे: दस-याला मागणी असणा-या झेंडूच्या फुलांना गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ५० टक्क्यांनी कमी भाव मिळाला आहे.चांगल्या दर्जाच्या झेंडूच्या फुलांना एका किलोला ४० ते ५० रुपये तर कमी दर्जाच्या फुलांना १० ते २० रुपये दर मिळाला.दस-याला झेंडूचे भाव खाली आले असले तरी  दिवाळीला झेंडूला चांगला भाव मिळेल,अशी शक्यता गुलटेकडी येथील फुल बाजारातील व्यापा-यांनी व्यक्त केली.दस-या निमित्ताने झेंडूच्या फुलांनी घराची सजावट केली जाते. त्याचप्रमाणे दुचाकी,चार चाकी वाहनांना फुलांच्या माळा घातल्या जातात. तसेच पूजेसाठीही फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे दस-याला झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. दसरा दोन दिवसांवर येवून ठेपल्याने मंगळवारी मार्केट यार्डातील फुल बाजारात झेंडूच्या फुलांची तब्बल ७३ हजार ९८६ किलो आवक झाली. मागणीच्या तुलनेत झेंडूची आवक झाल्याने फुलांना ४० ते ५० रुपये दर मिळाला. गेल्या वर्षी झेंडूला ८० ते १०० रुपये दर मिळाला होता.त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत झेंडूचे दर ५० टक्क्यांनी खाली आले आहेत.मार्केट यार्डातील फुलांचे व्यापारी सागर भोसले म्हणाले,दस-याला मोठ्या आकाराच्या झेंडूला अधिक मागणी असते.मात्र,काही ग्राहकांकडून कलकत्ता, अष्टगंधा आदी प्रकारच्या झेंडूला पसंती दिली जात आहे. झेडू बरोबरच शेवंतीच्या फुलांचीही खरेदी ग्राहकांकडून केली जाते.शेवंतीला ५० ते १०० रुपये तर गुलछडीला १२० ते २०० रुपये भाव मिळाला. झेडूची आवक आणि मागणी सारखीच असल्याने झेडूचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत.गणपती उत्सवाच्या तुलनेत दस-या झेंडूला चांगला भाव मिळत आहे.गणपतीमध्ये झेडूचे दर खूपच खाली उतरले होते.यंदा झेंडूची लागवड जास्त झाल्याने आवकही चांगली आहे.मात्र,दिवाळीनंतर झेंडूच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.------------------                      कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्रसिध्द करण्यात आलेले फुलांचे दर फुलाचे नाव     आवक         दर शेवंती पांढरी     १५,७६७        ४० ते ६० (किलो)शेवंती पिवळी    १९,१०४        १० ते २० (किलो)गुलाब               ८,५१२        २० ते ३० (गड्डी)डच गुलाब     ४,७४९        ३० ते ५० (गड्डी)

 

टॅग्स :PuneपुणेDasaraदसराMarket Yardमार्केट यार्ड