शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

यवतचे ग्रामविकास अधिकारीही निलंबित

By admin | Updated: July 9, 2015 02:18 IST

आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून यवत ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी डी. बी. केकाण यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी दिली.

यवत : आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून यवत ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी डी. बी. केकाण यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी दिली.यवत ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता असल्याची तक्रार गावातील शब्बीर सय्यद व भारीप-बहुजन महासंघाचे दौंड तालुकाध्यक्ष उत्तम गायकवाड यांनी केली होती. या तक्रारीत तथ्य आढळल्याने यवतचे सरपंच श्याम शेंडगे यांना पदावरून काढून टाकण्यात आले होते. यासाठी श्याम शेंडगे यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त, ग्रामविकासमंत्री व उच्च न्यायालयापर्यंत दाद मागितली होती. मात्र, सर्व ठिकाणी सरपंचांच्या विरोधात निकाल दिला गेला होता. मोठ्या रकमांचे बेअरर चेक काढणे, कामांच्या निविदा न मागविणे आदी बाबतींत अनियमितता आढळल्याने शेंडगे यांना पदावरून काढून टाकण्यात आले होते. ग्रामविकास अधिकारी डी. बी. केकाण यांची केवळ बदली करण्यात आली होती. याबाबत ग्रामविकास अधिकारी यांच्याबाबत अधिक चौकशी करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्णय घेण्याचे आदेश विभागीय आयुक्त यांनी सरपंच श्याम शेंडगे यांच्याबाबत दिलेल्या निकालात दिले होते. त्यानुसार अधिक चौकशीत कामांच्या निविदा काढताना ई-निविदा कार्यप्रणालीचा वापर न करणे, बांधकाम पूर्ण नसताना घरांच्या नोंदी करणे आदी बाबींमध्ये दोषी आढळल्याने ग्रामविकास अधिकारी डी. बी. केकाण यांना निलंबित करण्यात आल्याचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी सांगितले.कारभार चांगलाच गाजला४यवत ग्रामपंचायतीचा कारभार मागील काही वर्षांत आर्थिक अनियमिततेमुळे चांगलाच गाजला४सरपंच श्याम शेंडगे यांना पदावरून काढून टाकण्यात आले ४ त्यानंतर आता तत्कालीन ग्रामविकास अधिकारी डी. बी. केकाण यांनादेखील निलंबित करण्यात आले.४ग्रामपंचायतीचा कारभार पंचायत समितीपासून उच्च न्यायालयापर्यंत