शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कोरोना रुग्णाला मन:स्ताप न होऊ देता कोणी बेड द्याल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 07:12 IST

ग्रामीण भागात कोरोना रुग्णांना साध्या खाटेसह आॅक्सिजन किंवा व्हेंटिलेटर खाट (बेड) मिळवताना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर नक्की काय करायचे, कुठे जायचे काही कळत नाही.

पुणे - ग्रामीण भागात कोरोना रुग्णांना साध्या खाटेसह आॅक्सिजन किंवा व्हेंटिलेटर खाट (बेड) मिळवताना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर नक्की काय करायचे, कुठे जायचे काही कळत नाही.कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाल्यावर एखाद्या रुग्णाची तब्येत अचानक बिघडल्यास कोविड केअर सेंटर मधून रुग्णाला तातडीने पुण्याला अथवा आॅक्सिजन, व्हेंटिलेटर  खाट असलेल्या ठिकाणी रुग्णाला घेऊन जाण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला जातो. पण कोणत्या हॉस्पिटलमध्ये खाट उपलब्ध आहे, याची नेमकी माहिती अजूनही मिळत नाही. जिल्हा नियंत्रण कक्षालाफोन केला तर त्यांच्याकडून महापालिका नियंत्रण कक्षाचा नंबर दिला जातो. महापालिका नियंत्रण कक्षात फोन केला तर जिल्हा परिषदेकडे पाठवले जाते. परस्पर रुग्णालयांशी संपर्क साधला तर सगळ््या खाटा ‘फुल’ असल्याचे सांगितले जाते. यामुळे गंभीर रुग्णांनाही वेळेत खाट मिळवण्यासाठी प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो आहे.गेल्या काही दिवसांत शहर आणि ग्रामीण भागात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णाची तब्येत खालावल्यास नातेवाईकांना सांगितले जाते की, तुमच्या रुग्णांची परिस्थितीत गंभीर आहे तातडीने आॅक्सिजन, व्हेंटिलेटर खाट असलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला हलवा. असा निरोप आल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांची ससेहोलपट चालू होते. ग्रामीण भागातील रुग्णांना पुणे, पिंपरी-चिंचवड मध्ये आॅक्सिजन, व्हेंटिलेटर खाट उपलब्ध व्हावी यासाठी खास ‘बेड मॅनेजमेंट कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. परंतु या कक्षाकडे कोणतीही माहिती अचूक मिळत नाही.लाखोंच्या बिलामुळे खासगी रुग्णालयांचा धसकाखासगी रुग्णालयांमधल्या बिलाच्या संभाव्य आकड्याची भीती सामान्य रुग्णांना आहे. त्यामुळे महापालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयांना सर्वसामान्य कोरोना रुग्णांचे प्राधान्य असते.परिणामी या रुग्णालयांवरील ताण वाढला आहे. जम्बो हॉस्पिटलमध्ये आठशे रुग्णांची सोय होणार असल्याच्या घोषणेमुळे दिलासा निर्माण झाला होता.प्रत्यक्षात जम्बो हॉस्पिटलचा फोलपणा उघड झाल्यामुळे उपचार घ्यावेत कोठे असा प्रश्न सामान्य पुणेकरांपुढे उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे