गडकरी स्मारकाची पूजा; पुतळा बसविण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 04:43 IST2019-01-24T04:42:41+5:302019-01-24T04:43:48+5:30
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सदस्यांनी भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या पुण्यतिथी संभाजी उद्यानातील त्यांच्या स्मारकाची पूजा केली.

गडकरी स्मारकाची पूजा; पुतळा बसविण्याची मागणी
पुणे : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सदस्यांनी भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या पुण्यतिथी संभाजी उद्यानातील त्यांच्या स्मारकाची पूजा केली. या स्मारकाची तोडफोड करण्याच्या प्रकाराचा जाहीर निषेध करून गडकरींचा पुतळा उद्यानात पूर्ववत बसवावा, अशी मागणी केली.
महासंघाचे प्रवक्ते आनंद
दवे, पुणे जिल्हा अध्यक्ष विजय शेखदार, पुणे शहर अध्यक्ष मयुरेश आरगडे, आदी या वेळी उपस्थित होते. गडकरी यांची मंगळवारी पुण्यतिथी होती. या निमित्त बुधवारी त्यांच्या स्मारकस्थळी पूजा करून अभिवादन केले.
३ वर्षांपूर्वी उद्यानातील गडकरींचा पुतळा तोडण्यात
आला, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात होते. १५
दिवसांत पुतळा बसवून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, कार्यवाही झालेली नाही, असे दवे यांनी सांगितले.
दरम्यान, संभाजी ब्रिगेडने गडकरींचा नव्हे, तर संभाजी महाराजांचा पुतळा बसवा, अशी मागणी केली आहे.