शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
4
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
5
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
6
USA vs CAN : वर्ल्ड कपचा श्रीगणेशा! कॅनडा विरूद्ध अमेरिका म्हणजे IND vs PAK, जाणून घ्या कारण
7
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
8
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
9
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
10
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
11
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
12
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
13
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
14
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
15
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
16
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
17
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
18
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी
19
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
20
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर

चिंताजनक..! भीमा खोऱ्यातील पाच धरणांत शून्य टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 7:00 AM

परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे सात धरणांत दहा टक्यांपेक्षा कमी पाणीपश्चिम महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट

पुणे : भीमा खोरे प्रकल्पातील पाच धरणांत शून्य टक्के तर सात धरणात दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा उरला आहे. मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्यास या भागातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली आहे. राज्यातील सर्वाधिक क्षमता असणारे उजनी धरण यंदा शंभर टक्के भरले होते. मात्र, उजणीची पाणी पातळी शून्य टक्क्यापेक्षा खाली गेली असून सध्या धरणात उणे १९.७२ टीएमसी पाणी आहे. पश्चिम महाराष्ट्राला भीमा खोऱ्यातील धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. सध्या भीमा खोऱ्यातील २५ धरणांपैकी पाच धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यात पिंपळगाव जोगे, डिंभे, घोड, टेमघर, नाझरे या धरणांचा समावेश आहे.तसेच माणिक डोह, येडगाव, वडज,विसापूर, चासकमान, निरा देवधर व भाटघर धरणात १० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध असून या इतर ९ धरणांमध्ये केवळ २० ते ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.    गेल्या सहा महिन्यापूर्वी बहुतांश सर्व धरणात ७० ते ८० टक्के पाणीसाठा होता.तर काही भागात परतीचा पाऊसच न झाल्याने सात ते आठ धरणांमध्ये ३० ते ५० टक्क्यांपर्यंत पाणी उपलब्ध होतो.परंतु,गेल्या सहा महिन्यात पाणी पातळीमध्ये चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर महाष्ट्रात मान्सूनचे आगमन होते. परंतु, गेल्या काही वर्षांचा आधार घेतला तर मान्सूनने महाराष्ट्रात दाखल होण्यास जुलै महिन्यापर्यंतचा कालावधी घेतल्याचे दिसून येते. मान्सून लांबल्यास १० ते ३० टक्क्यांपर्यंत धरणसाठा उपलब्ध असलेल्या नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे,असे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.---भीमा खो-यातील धरणांची पाणीसाठ्याची टक्केवारी धरण             टक्केवारीपिंपळगाव जोगे   ०.०० माणिकडोह         २.८६ येडगाव              ९.८५ वडज                १.१५ डिंभे                  ०.००  घोड                ०.००  विसापूर             ७.४२कळमोडी              १८.१४ चासकमान           ४.२४ भामा आसखेड     १४.४३ वडीवळे              ४१.६३ आंद्रा                  ४९.४६ पवना                  २६.२५ कासारसाई           २५.४०मुळशी                १६.२८टेमघर                 ०.०० वरसगाव            ११.१०पानशेत               २६.६६ खडकवासला     २७.१९ गुंजवणी             २२.०७ निरा देवधर         ३.२८ भाटघर             ७.२८वीर                   २३.४०नाझरे                ०.००उजनी             (उणे) -३६.८१

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीdroughtदुष्काळ