शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

चिंताजनक ! उजनी जलाशयाची पाणीपातळी झपाट्याने खालावतेय : उणे ३२.५३ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 7:00 AM

रोज एक टक्का उजनी धरणातील पाणी कमी होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : पाण्याअभावी अनेक ठिकाणी शेतपिकांचे नुकसान

इंदापूर  : उजनी जलाशयाची पाणीपातळी दिवसेंदिवस झपाट्याने खालावत असल्याने, उजनी धरण खूपच उघडे पडलेले व भकास दिसत आहे. मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ११० टक्के भरलेले धरण सात महिन्यांतच उणे ३२.५३ टक्केपर्यंत आलेले आहे. यामुळे इंदापूर तालुका व सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

उजनीच्या पट्ट्यातील अनेक गावांतील शेतकरी यांना या संकटाचा सामना करावा लागणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पाण्याअभावी शेतजमिनी कोरड्या पडून बागायत पिकांचे व जनावरांच्या चाऱ्यांचा खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढलेले आहे. रोज एक टक्का उजनी धरणातील पाणी कमी होत आहे. पावसासाठी अजून दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी जाणार असून, सोलापूरसह पुणे जिल्ह्यात चालू वर्षी पाऊस कमी पडल्याने भूजल पातळी खूप कमी झाली आहे. विहिरी व बोअरवेल यांनी तर मार्च महिन्यापूर्वी तळ गाठला असल्याने पाण्याची गंभीर अवस्था उजनी पट्ट्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांना पाण्याचे नियोजन तर अत्यंत काटकसरीने करावे लागणार आहे. चौकट    उजनीच्या कालवा व बोगद्याचे तोंड सध्या बंद पडले असून, उजनी धरणाच्या पुढील पट्ट्यात पंढरपूर, सांगोला या भागात शेतकºयांची पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे आता पाऊस पडल्यानंतरच, धरणाची पाणीपातळी वाढल्यानंतर पुढे कालवा व बोगद्याला पाणी सोडता येणार आहे.चौकट    सध्या उजनीची पाणीपातळी ४८८.१८० मीटर आहे. एकूण पाणीसाठा १३०९.२८ दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठा मायनस ४९३.५३ दलघमी आहे. एकूण टीएमसी ४६.२३ आहे. तर उपयुक्त टीएमसी उणे १७.४३ आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीत पाणीसाठा प्लस २१.८३ टक्के होता. तर यंदा तेच धरण  उणे मध्ये  गेले आहे.____________________________________________

टॅग्स :Ujine Damउजनी धरणWaterपाणीdroughtदुष्काळFarmerशेतकरी