सीएनजी पंपावर गॅसचे नोझल उडल्याने कामगाराला गमवावा लागला डोळा, धनकवडीतील तीन हत्ती चौक येथील घटना,
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:40 IST2024-12-17T12:39:35+5:302024-12-17T12:40:08+5:30
सहकार नगर पोलीस ठाण्यात पंप मालकावर गुन्हा दाखल

सीएनजी पंपावर गॅसचे नोझल उडल्याने कामगाराला गमवावा लागला डोळा, धनकवडीतील तीन हत्ती चौक येथील घटना,
धनकवडी : दुचाकी मध्ये सीएनजी भरत असताना गॅसचे नोझल उडून एका कर्मचाऱ्याला त्याचा डोळा कायमचा गमावावा लागला. ही घटना धनकवडीतील तीन हत्ती चौकातील एस स्वेअर सीएनजी पंपावर घडली.
याप्रकरणी पंप मालक धार्यशील पानसरे व राहीत हरकुर्ली यांच्या विरुध्द सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत हर्षद गणेश गेहलोत ( रा.शंकर महाराज वसाहत, धनकवडी ) या कर्मचाऱ्याला डोळा गमवावा लागला .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हर्षद हे पंपावर सीएनजी भरण्याचे काम करतात. रविवारी सायंकाळी ते एका दुचाकी मध्ये गॅस भरत होते. या वेळी अचानक गॅसचे नोझल त्यांच्या तोंडावर उडाले. यामध्ये त्यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत होऊन त्यांना डोळा गमवाव लागला. याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप चव्हाण तपास करत आहेत.