दारू न दिल्याने कामगाराला बेदम मारहाण; येरवडा पोलिसांकडून एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:48 IST2025-06-17T16:48:25+5:302025-06-17T16:48:50+5:30

पुणे : उधारीवर दारू न दिल्याच्या रागातून वाईन शाॅपमधील कामगाराला बेदम मारहाण केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली. रोहित ...

Worker brutally beaten up for not giving him liquor; One arrested by Yerwada police | दारू न दिल्याने कामगाराला बेदम मारहाण; येरवडा पोलिसांकडून एकाला अटक

दारू न दिल्याने कामगाराला बेदम मारहाण; येरवडा पोलिसांकडून एकाला अटक

पुणे : उधारीवर दारू न दिल्याच्या रागातून वाईन शाॅपमधील कामगाराला बेदम मारहाण केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली. रोहित पिल्ले (वय २५, रा. जयजवानगर, लक्ष्मीनगर, येरवडा) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत श्रीकांत तानाजी राजगुरू (वय ३८, रा. आझाद आळी, येरवडा गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे. पिल्ले याने केलेल्या मारहाणीत वाइन शाॅपमधील कामगार करण संतोष आहुजा (वय २८) हेही जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा भागातील वाइन शाॅपमध्ये पिल्ले रविवारी (१५ जून) रात्री नऊच्या सुमारास आला. त्याने उधारीवर दारूची बाटली मागितली. वाइन शाॅपमधील कामगार आहुजा याने दारू देण्यास नकार दिल्याने पिल्ले चिडला. त्याने दुकानातील गल्ल्याजवळील काच फोडली. आहुजा यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत आहुजा यांचा दात पडला. सहायक पोलीस निरीक्षक सावंत तपास करत आहेत.

Web Title: Worker brutally beaten up for not giving him liquor; One arrested by Yerwada police