शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मेट्रोचे कामाला परवानगी मिळाली पण समोर अडचणी अनंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 18:00 IST

मागील महिनाभर मेट्रोचे सगळेच काम थांबले आहे.

ठळक मुद्देपरवानगी मिळाली असली तरी लागू करण्यात आलेल्या अटींमुळे कामाच्या गतीवर परिणाम तब्बल २ हजार मजूरांचा बोजा महामेट्रो करत आहे सहन

राजू इनामदारपुणे: महामेट्रो कंपनीचे पुणेमेट्रो चे कोरोना लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले काम येत्या दिवसात सुरू होईल. स्थानिक अधिकायार्ची त्यासाठी परवानगी घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. परवानगी मिळाली असली तरी त्यासाठी लागू करण्यात आलेल्या अटींमुळे कामाच्या गतीवर त्याचा परिणाम होईल असे महामेट्रोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे पुणे मेट्रो धावायला आता बराच विलंब होण्याची चिन्हे आहेत.मागील महिनाभर मेट्रोचे सगळेच काम थांबले आहे. तब्बल २ हजार मजूरांचा बोजा महामेट्रो सहन करत आहे. वनाज ते रामवाडी तसेच पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट अशा ३१ किलोमीटरच्या दोन मार्गांचे काम ४ ठिकाणी व एक ५ किलोमीटर अंतराचा भुयारी मार्ग अशा ५ टप्प्यांवर गेली दोन वर्ष सुरू आहे. साधारण २ हजार मजूर यावर काम करत होते. कोरोना लॉकडाऊन सुरू झाला व हे सगळेच काम बंद पडले.आता केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन काही गोष्टींबाबत शिथील करण्याचा निर्णय घेतला असून त्यात मेट्रोच्या कामाचा समावेश आहे.काम सुरू करण्याला परवानगी असली तरी त्यासाठी सरकारने अनेक अटीही घातल्या आहेत. त्यात प्रामुख्याने सोशल डिस्टन्सिंग, कर्मचार्यांची निवास व्यवस्था, त्यांच्या वाहतूकीला मनाई या व अन्य काही अटी़चा समावेश आहे. त्याचे पालन करून काम कसे सुरू करता येईल यावर महामेट्रो व्यवस्थापन वरिष्ठ स्तरावर चर्चा करत आहे. एखादे काम अशा प्रकारच्या अटी पाळून करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने कामाची गती, जास्त मनुष्यबळ लावता न येणे अशा काही गोष्टींवर परिणाम होईल असे वरिष्ठ अधिकार्यांचे मत आहेसोशल डिस्टन्सिंग पाळून काम सुरू करायचे तरी कसे असा मोठा प्रश्न महामेट्रोपुढे आहे. त्यातही भुयारी मागार्चे बरेचसे काम यंत्राद्वारे होते आहे, पण रस्त्यावरच्या कामाला मात्र बरेच मनुष्यबळ लागते. त्यात सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार असे अधिकार्यांचे मत आहे.त्यातूनच पावसाळ्यापूर्वी करायचे म्हणून नदीपात्रातील अपुरे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला क्षअसल्याची माहिती मिळाली. वनाज ते रामवाडी या मेट्रो मागार्ची दोन स्थानके मुठेच्या पात्रातच आहे. तसेच साधारण ८०० मीटर अंतराचे ५९ खांब पात्राच्या कडेला आहेत. संगम ब्रीजजवळही नदीपात्रात मेट्रो चे काम आहे. या कामांसाठी महामेट्रो च्या ठेकेदार कंपनीने पात्रात तात्पुरता भरावही टाकला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे सगळे काम पुर्ण होऊन भराव.काढणे गरजेचे आहे. त्यामुळेच या कामाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान काम सुरू करण्यात स्थानिक अधिकार्यांची परवानगी अशीही अट आहे. त्यात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांचा समावेश आहे. कामाची परवानगी मागणारा एक सविस्तर प्रस्ताव त्यांच्यासाठी तयार करण्याचे आदेश महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी त्यांच्या स्थानिक अधिकार्यांना दिला आहे. त्यावर सध्या येथील वरिष्ठ अधिकार्यांचे काम सुरू आहे. त्यांच्याकडून प्रस्तावाचा अभ्यास, त्यातील संभाव्य धोक्यांची चर्चा होऊन प्रत्यक्ष परवानगी मिळण्यास बराच कालावधी लागेल असा महामेट्रोच्या अधिकार्यांचा अंदाज आहे...........................साधारण २ हजार मजूर व १ हजार वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी यांचे तब्बल महिनाभराचे कामाचे तास वाया गेलेत. काहीशे कोटी रूपयांचे हे नूकसान आहे. या काळात मजूरांची रेशनिंग पासूनची काळजी घेतली जात होती. ठेकेदार कंपनीने कामाची मुदत वाढवण्याची, नूकसान भरून देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होईल. काम सुरू करण्याची परवानगी मिळाली असली तरी त्यात अनेक अटी आहेत. त्या अर्थातच पाळल्या जातील. स्थानिक अधिकार्यांची परवानगी मागत आहोत. नदीपात्रातील कामच सुरू करण्यात येईल. मेट्रो कधी धावेल.हे आता सांगता येणे अवघड आहे, कोरोनाने आमचे सगळेच वेळापत्रक पुढे गेले. पण आमचा प्रयत्न काम लवकर सुरू व्हावे असाच आहे.अतुल गाडगीळ,संचालक, महामेट्रो (वर्क)

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार