शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ हिरावणार ८० हजार जणांचे काम

By admin | Updated: September 3, 2015 03:13 IST

पाण्यासाठी वणवण करावी लागत असतानाच आता राज्य शासनाने उद्योगांना देण्यात येणाऱ्या पाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने बारामती परिसरातील बारामती

सुनील राऊत/महेंद्र कांबळे, बारामतीपाण्यासाठी वणवण करावी लागत असतानाच आता राज्य शासनाने उद्योगांना देण्यात येणाऱ्या पाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने बारामती परिसरातील बारामती, जेजुरी तसेच कुरकुंभमधील तब्बल ८० हजार कर्मचाऱ्यांना बेरोजगाराचा सामना करावा लागणार आहे. या तिन्ही एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांचा पाणीसाठा कमालीचा घटल्याने ही परिस्थिती ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिन्ही एमआयडीसींमध्ये सुमारे ५००हून अधिक लहानमोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. या कंपन्यांना लागणारा कच्चा माल तसेच पूरक साहित्य उपलब्ध करून देणारे इतर लहानमोठे व्यवसायही बंद पडणार आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या परिस्थितीने कष्टकऱ्यांच्या पोटाचाही प्रश्न निर्माण होणार असल्याने लोकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. बारामती एमआयडीसी थांबणार?बारामती एमआयडीसीला उजनी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी सुमारे ३०० हून अधिक लहानमोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्या तसेच आवश्यक असलेले पूरक साहित्य पुरविणाऱ्या कंपन्यांत मिळून सुमारे ५० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कंपन्यांसाठी दरदिवशी १० ते १२ एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते. १९९० पासून म्हणजेच एमआयडीसी सुरू झाल्यापासून २४ तास पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, या वर्षी उन्हाळ्यात निर्माण झालेली पाणीटंचाई आणि त्यानंतर पावसाळा सुरू होऊन तीन महिने लोटले, तरी पुरेसा न झालेला पाऊस यांमुळे पाच महिन्यांपासून पाच ते सहा तासच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आता उजनी धरणाची पाणीपातळीही कमालीची खालावल्याने तसेच शासनाने उद्योगांचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने हे पाणीही बंद झाल्यास या एमआयडीसीमधील उत्पादन २५ वर्षांत पहिल्यांदाच थांबेल. ...तर बाजारपेठाही होतील ठप्प पाण्याअभावी या कंपन्यांचे कामकाज बंद पडून या कामगारांचा रोजगार हिरावणार असून, त्याचा थेट परिणाम या परिसरात विकसित झालेल्या बाजारपेठांवर होईल. या महिन्यात गणेशोत्सव, तर पुढील दोन महिन्यांत दसरा-दिवाळी येत असल्याने ऐन सणासुदीच्या कालावधीत रोजगार हिरावला गेल्यास त्याचा या परिसरातील बाजारपेठांवर गंभीर परिणाम होणार असून, आर्थिक उलाढाल थंडावणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.जेजुरीला दोन दिवसांतून एकदाच पाणी जेजुरी एमआयडीसीला दडी मारलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारे नाझरे धरण कोरडे पडले असल्याने तसेच या एमआयडीसीसाठी वीर धरणाच्या मांडकी डोहातून आणलेली पर्यायी पाण्याची व्यवस्थाही पावसाअभावी कोरडीठाक पडल्याने या एमआयडीसीला आधीच दोन दिवसांतून एकदा पाणी देण्यात येत आहे. या एमआयडीसीसाठी दरदिवशी ४ ते ५ एमएलडी पाण्याची गरज भासते. त्यातच आता शासनाचा निर्णय झाल्यास या ठिकाणचे उत्पादन पूर्णपणे थांबणार आहे. या एमआयडीसीमध्ये जवळपास ४ ते ५ हजार कामगारांना रोजगार मिळालेला आहे. यात प्रामुख्याने औषधनिर्माण तसेच काही स्टील कंपन्यांचा समावेश आहे. आधीच या ठिकाणी उत्पादनावर परिणाम होण्यास सुरुवात आहे.पुण्याच्या पाण्यावर कुरकुंभचे भवितव्यकुरकुंभ एमआयडीसीला खडकवासला धरणातून जाणाऱ्या कालव्यातून पाणीपुरवठा केला जातो. या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये जेमतेम ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. याच पाण्यावर पुणे शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असल्याने या धरणांतील सर्व पाणी पुणे शहरासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय झाल्यास कुरकुंभ एमआयडीसीतील कंपन्यांचे उत्पादन ठप्प होईल. या एमआयडीसीला दरदिवशी सुमारे ७ एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते. या एमआयडीसीमध्ये जवळपास १५० कंपन्या असून, त्या ठिकाणी तब्बल १२ ते १३ हजार कामगार आहेत. त्यामुळे एमआयडीसीचे भवितव्य पुण्याच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे स्पष्ट आहे.