शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

'हिंदू म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांनी दररोज डॉ. आंबेडकरांच्या पायांचे पूजन केले पाहिजे'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 7:35 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदू मॅरेज बिल’ याचा आग्रह धरला नसता तर आज हिंदू स्त्रियांचे काय झाले असते, याचा विचारही करवत नाही. त्यामुळे स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या सर्व स्त्रियांनी दररोज डॉ. आंबेडकर यांच्या पायांचे पूजन केले पाहिजे.

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदू मॅरेज बिल’ याचा आग्रह धरला नसता तर आज हिंदू स्त्रियांचे काय झाले असते, याचा विचारही करवत नाही. त्यामुळे स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या सर्व स्त्रियांनी दररोज डॉ. आंबेडकर यांच्या पायांचे पूजन केले पाहिजे. तसेच आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यांनी आपल्या अनुयायांना मुस्लिम धर्माची दीक्षा दिली नाही, याचेही सर्व हिंदूंनी आयुष्यभर आभार मानले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी केले.

स्वा. सावरकर वाङ्मय वक्तृत्व स्पर्धा समितीच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास समितीचे पदाधिकारी सु. ह. जोशी, विद्याधर नारगोलकर, दिलीप पुरोहित, आरती दातार, वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक मिलिंद वेर्लेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी समितीतर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. गोखले म्हणाले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विज्ञानवाद लोकांना पटत नाही. गाय हा पशू आहे, असे सावरकरांनी सांगितल्याने स्वत:ला हिंदू म्हणवणारा सावरकर यांच्यापासून दूर जातो; ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सावरकरभक्त, सावरकरप्रेमी बनण्यापेक्षा सावरकर विचारप्रेमी व्हावे, सावरकरांचे विचारच कदाचित आपल्या देशाला वाचवू शकतील. तसेच हिंदू आणि हिंदुत्वाची व्याख्या सावरकरांकडून मिळते; ती समजून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. सावरकर आणि आंबेडकर एकत्र आले असते तर आजचा भारत वेगळा दिसला असता. सावरकरांनी कधीही दुसऱ्या धर्माचा द्वेष केला नाही. त्यामुळे संपूर्ण सावरकर समजून घेण्यासाठी कदाचित दुसरा जन्म घ्यावा लागेल. 

पुढेा ते म्हणाले की, 'देशातील आदर्शवत असणाऱ्या व्यक्तींना देवत्वाचे स्वरूप दिले जाते. मात्र, त्या व्यक्ती पूर्वी माणूसच होत्या. त्यांच्याकडूनही काही चूक झाल्या असतील. हे कोणीही मान्य करत नाही. देशाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.सावरकरांची हिंदुत्वाची खरी व्याख्या समजून घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मण ही जात नसून पदवी आहे. जो शुद्ध होतो तो बुद्ध होतो. तसेच आमचे श्रीराम मोठे, आमचे कृष्ण मोठे म्हणून आम्ही मोठे, असे म्हणणे चुकीचे आहे. त्यातच कथाकथित राजकारण्यांकडून जातीचे विष पेरले जाते. समाजातून नेहमी एकांगी विचार केला जातो आणि परंपरने दिलेल्या गोष्टी पुढे घेऊन जाण्याकडे लक्ष दिले जाते. परंतु, प्रत्येक गोष्टीचा दुसऱ्याही बाजूने विचार व्हायला हवा., असेही गोखले यांनी या वेळी सांगितले.

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखलेDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीHinduहिंदूmarriageलग्न