Pune: पीएमपी बसमध्ये महिलेचे १.११ लाखांचे मंगळसूत्र चोरले, स्वारगेट परिसरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 10:13 AM2024-01-04T10:13:48+5:302024-01-04T10:14:12+5:30

ही घटना १ जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे...

Woman's mangalsutra worth 1.11 lakh stolen in PMP bus, incident in Swargate area | Pune: पीएमपी बसमध्ये महिलेचे १.११ लाखांचे मंगळसूत्र चोरले, स्वारगेट परिसरातील घटना

Pune: पीएमपी बसमध्ये महिलेचे १.११ लाखांचे मंगळसूत्र चोरले, स्वारगेट परिसरातील घटना

पुणे : पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख ११ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी, दत्तनगर आंबेगाव येथील ७४ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे.

फिर्यादी ज्येष्ठ महिला पीएमपी बसने कात्रज ते स्वारगेट असा प्रवास करीत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी केले. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून शहरातील बस प्रवासात महिलांचे दागिने चोरी जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येते आहे. प्रामुख्याने ज्येष्ठ महिलांना चोरट्यांकडून टार्गेट केले जाते आहे.

Web Title: Woman's mangalsutra worth 1.11 lakh stolen in PMP bus, incident in Swargate area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.