पोलीस शिपायाकडून महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग; चौकीच्या दारातच महिलेवर हल्ला

By नितीश गोवंडे | Published: September 4, 2023 05:46 PM2023-09-04T17:46:20+5:302023-09-04T17:46:41+5:30

पोलीस शिपाई निलेश भालेराव सतत महिला अधिकाऱ्याच्या मोबाइलवर फोन करून त्यांना त्रास देत होता

Woman police inspector molested by police constable; Attack on the woman at the door of the checkpoint | पोलीस शिपायाकडून महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग; चौकीच्या दारातच महिलेवर हल्ला

पोलीस शिपायाकडून महिला पोलिस निरीक्षकाचा विनयभंग; चौकीच्या दारातच महिलेवर हल्ला

googlenewsNext

पुणे : शहरात कार्यरत असलेल्या ५५ वर्षीय महिला पोलिस निरिक्षक महिलेचा मुंबईतील फोर्स वन पथकात कार्यरत असणाऱ्या एका ३४ वर्षीय पोलिस शिपायाने विनयभंग केल्याची घटना सिंहगड रोडवरील अभिरुची पोलिस चौकीत घडली आहे. याप्रकरणी महिला पोलिस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून निलेश आंद्रेस भालेराव (रा. कोले कल्याण, पोलिस वसाहन बिल्डींग १, रुम नं. ४०४, सांताक्रुझ, मुंबई) याच्याविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पोलिस निरीक्षक या २०१८ साली पुण्यातील एमआयए येथे नेमणुकीस होत्या. त्यावेळी आरोपी निलेश भालेराव हा फोर्स वनच्या ट्रेनिंगसाठी एमआयए येथे आला होता. त्यावेळी त्याने संबंधित महिला अधिकाऱ्याच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून त्यांचा विनयभंग केला होता.

या प्रकरानंतर तक्रारदार महिला उपनिरीक्षकांनी त्याच्याविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर निलेश भालेरावच्या कुटुंबियांनी केलेल्या विनंतीवरून तो गुन्हा मागे घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही निलेश भालेराव सतत महिला अधिकाऱ्याच्या मोबाइलवर फोन करून त्यांना त्रास देत होता. त्यामुळे याबाबतची अदखलपात्र स्वरूपाची तक्रार त्यांनी अभिरुची पोलिस चौकी येथे केली होती.

ही तक्रार करून तक्रारदार महिला अधिकारी त्यांच्या पतीसोबत घरी जात असताना, निलेश भालेरावने ‘हे काही बरोबर केले नाही, माझा त्रास तुम्ही आणखीन वाढवला’ असे मोठ्याने बोलला. तसेच तक्रारदार महिला या अभिरूची चौकीतून बाहेर पडत असताना, त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना तेथे असलणाऱ्या पायऱ्यांवर ढकलून त्यांच्या शरीराला वाईट हेतूने स्पर्श करत शिवीगाळ केली. याप्रकरणाचा पुढील तपास सिंहगडरोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चंदनशिव करत आहेत.

Web Title: Woman police inspector molested by police constable; Attack on the woman at the door of the checkpoint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.