बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 10:02 AM2024-05-23T10:02:09+5:302024-05-23T10:36:15+5:30

अहमदनगरमध्ये बुडालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या पथकाची बोट उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Ujani Dam Backwater Boat Accident SDRF team boat searching for the drowned people overturned | बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू

बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू

हेमंत आवारी

SDRF Boat Accident : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये मंगळवारी वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडून सहा जण बेपत्ता झाले होते. २० तासांच्या शोधानंतर त्यातील पाच जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. दुसरीकडे आता अहमदनरगमध्ये आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नदीत बुडालेल्या लोकांच्या शोधासाठी चालवण्यात आलेली बोट बुडाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून तिघांचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

उजनी दुर्घटना बोट दुर्घटना ताजी असतानाच अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील प्रवरा नदीत एसडीआरएफ पथकाची बोट उलटली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तिघांचा शोध सुरु आहे. प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफचे पथक आणि एक स्थानिक असे एकूण सहाजण बोटीतून गेले होते. मात्र बोट उलटल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला तर तिघे बेपत्ता झाले आहेत. उर्वरित तिघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत.

नगरच्या अकोले तालुक्यातील प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफ पथकातील सहा जण गुरुवारी सकाळी बुडाले. सुगाव बुद्रुक शिवारात बुधवारी वनविभागाच्या रोपवाटिके जवळपास प्रवरा नदी पात्रात पोहण्यासाठी पाण्यात  दोन तरूण पाण्यात बुडाले होते. त्यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुसर्‍याचा शोध सुरू होता. तरुणाच्या शोधासाठी धुळ्याहून आलेले राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक गुरुवारी सकाळी दोन बोटी घेऊन नदीपात्रात उतरले होते. 

मात्र नदीपात्रात मोठा भोवरा व खड्डा असल्याने यात एसडीआरएफची एक बोट पलटी होऊन शोध पथकातील पाच आणि एक स्थानिक असे सहा जण बुडाले. यातील पाच जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यातील एक पंकज पवार सुखरूप असल्याचे समजते. दुसरा अशोक पवार अत्यावस्थ असून भांडकोळी रूग्णालयात उपचार घेत आहे. तर प्रकाश नामा शिंदे, वैभव सुनील वाघ, राहुल गोपीचंद पावरा या एसडीआरएफच्या तीन जवानांचे मृतदेह मिळाले आहे. पाण्यात बुडालेला स्थानिक गणेश मधुकर देशमुख - वाकचौरे याचा व काल बुडालेला अर्जुन रामनाथ जेडगुले याचा देखील प्रशासनाकडून शोध सुरू आहे.

दोघांचा शोध घेताना सहा बुडाले 

बंधाऱ्या लगत पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने अर्जुन रामनाथ जेडगुले आणि सागर पोपट जेडगुले हे दोघे पाण्यात बुडाले होते. यांच्या सोबत असलेल्या इतरांनी तसेच गावकरी , पोलीस आणि पट्टीचे पोहणाऱ्यांनी शोध सुरु केला होता. त्यांना सागर पोपट जेडगुले  याचा मृतदेह शोधण्यात यश आले होते. तर अर्जूनचा मृतदेह शोधण्यासाठी एसडीआरएफ ची टीम बोलवण्यात आली होती. मात्र त्यानंतर मोठी दुर्घटना घडली.

Web Title: Ujani Dam Backwater Boat Accident SDRF team boat searching for the drowned people overturned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.