शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

DJ च्या कर्कश आवाजामुळे महिलेचा गेला जीव?; हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 23:39 IST

डीजेच्या अति तीव्र आवाजामुळे आईला त्रास होऊन तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप जाधव यांचा मुलगा सौरभ यांनी केला आहे.

पुणे -  आवाजाची पातळी ओलांडून सुरू असलेल्या डीजेच्या अति आवाजामुळे ससाणेनगर येथील एका महिलेचा जीव गेला आहे. श्रीराम जन्मोत्सवाची डीजेच्या तालावरील मिरवणूक पाहायला गेलेल्या  रंजना रवींद्र जाधव (वय-६५, रा. गल्ली क्र. १२, ससाणेनगर) या महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ससाणेनगर येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  डीजेच्या अति आवाजामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप संबंधीत महिलेच्या मुलाने केला आहे.

ससाणेनगर येथील मुख्य रस्त्यावर गुरुवारी मंडळांनी राम जन्मोत्सव सोहळा मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी ध्वनीवर्धक म्हणून डीजेचा वापर करण्यात आला होता. ही मिरवणूक पाहण्यासाठी घरातील काही कामे उरकून रंजना जाधव या रस्त्यावर आल्या होत्या. थोड्याच वेळात त्यांना छातीत दुखू लागल्याने त्या ओरडून खाली कोसळल्या. धनिवर्धकाच्या आवाजामुळे त्यांच्या आवाजाकडे कुणाचेही लक्ष गेले नाही.

त्या जेंव्हा खाली कोसळल्या त्यावेळी सोबतच्या महिलांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने हालचाल करून जाधव यांना ऑटो रिक्षात बसविले मात्र, मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी झाल्याने ऑटो रिक्षा रुग्णालयात जाण्यासाठी खूप वेळ गेला. रुग्णालयात तपासणी केली असता त्यांचे रुग्णालयात आणण्यापूर्वीच हृदयविका निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. श्रीमती जाधत लष्कराच्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (सीएमई) मधून निवृत्त झालेल्या आहेत.

दरम्यान, डीजेच्या अति तीव्र आवाजामुळे आईला त्रास होऊन तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप शजाधव यांचा मुलगा सौरभ यांनी केला आहे. या ठिकाणी पोलीस असूनही आवाजावर नियंत्रण नव्हते. याशिवाय आईला त्रास झाल्यानंतर मिरवणुकीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीतून तिला रुग्णालयात नेईपर्यंत मोठा वेळ गेल्यानेही तिचा मृत्यू झाला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत काळे पडळक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.त्यामुळे पुढील कारवाई बाबत समजू शकले नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : DJ's Loud Noise Allegedly Kills Woman; Heart Attack Suspected

Web Summary : A 65-year-old woman in Sasanenagar died of a heart attack allegedly due to excessive DJ noise during a Ram Janmotsav procession. Her son blames the loud music and traffic congestion for the tragic incident, hindering timely medical assistance.