महिलेचे व्हिडिओ चित्रीकरण; अखेर बुधवार पेठ प्रकरणात 'त्या' पत्रकारावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 13:49 IST2026-04-11T13:48:24+5:302026-04-11T13:49:12+5:30

याप्रकरणी त्या पत्रकारांवर गुन्हा दाखल करावा, कोणालाही पाठीशी घालू नये, अशा कृत्याचे आम्ही समर्थन करत नाही, अशी भूमिका पत्रकार संघाने घेतली आहे.

Woman filmed video Finally a case was registered against 'that' journalist in the Budhwar Peth case | महिलेचे व्हिडिओ चित्रीकरण; अखेर बुधवार पेठ प्रकरणात 'त्या' पत्रकारावर गुन्हा दाखल

महिलेचे व्हिडिओ चित्रीकरण; अखेर बुधवार पेठ प्रकरणात 'त्या' पत्रकारावर गुन्हा दाखल

पुणे : बुधवार पेठ परिसरात एका महिलेचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण केल्याच्या गंभीर प्रकरणात एका वृत्तवाहिनीचा पत्रकार रोहन राजेंद्र कदम (वय २८, रा. गांधी चौक ता. पुरंदर वाल्हे) याच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित महिलेने याबाबत जबाब नोंदवला होता. स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली पत्रकार रोहन कदम याने महिलेच्या परवानगीशिवाय अश्लील स्वरूपाचे व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचा आरोप  आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. 

तक्रारीची दखल घेत पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत संबंधितावर गुन्हा नोंदवला आहे. रोहन कदम याच्यासह त्याच्यासोबत असलेल्या अन्य तीन जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. चार दिवसांपूर्वी झालेल्या याप्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पुणे श्रमिक पत्रकार संघाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याप्रकरणी त्या पत्रकारांवर गुन्हा दाखल करावा, कोणालाही पाठीशी घालू नये, अशा कृत्याचे आम्ही समर्थन करत नाही, अशी भूमिका पत्रकार संघाने घेतली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title : पुणे के बुधवार पेठ में महिला का वीडियो बनाने पर पत्रकार के खिलाफ मामला दर्ज

Web Summary : पुणे के बुधवार पेठ में एक महिला का बिना सहमति के वीडियो बनाने पर पत्रकार रोहन कदम के खिलाफ मामला दर्ज किया गया। शिकायत के बाद पुलिस ने छेड़छाड़ का मामला दर्ज किया। तीन अन्य भी मामले में शामिल हैं। जांच जारी है।

Web Title : Journalist Booked for Filming Woman in Pune's Budhwar Peth

Web Summary : A journalist, Rohan Kadam, is booked for filming a woman without consent in Pune's Budhwar Peth. Police filed molestation charges following a complaint. Three others are also implicated in the case. Investigation ongoing.