शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
5
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
6
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
7
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
9
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
11
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
12
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
13
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
14
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
15
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
16
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
17
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
18
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
19
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
20
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?

लांडगेंची हॅट्रिक होणार की पवार गट बाजी मारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 14:40 IST

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून शरद पवारांकडे परततेल्या अजित गव्हाणे यांनी त्यांच्यापुढे तगडे आव्हान उभे

पिंपरी  : पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने होणाऱ्या गृहप्रकल्पांचा पाणीपुरवठा, सुरक्षा आणि पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी या प्रश्नांच्या गर्तेत असलेल्या भोसरी मतदारसंघात यंदा महायुतीतील भाजपचे महेश लांडगे हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून शरद पवारांकडे परततेल्या अजित गव्हाणे यांनी त्यांच्यापुढे तगडे आव्हान उभे केले आहे.औद्योगिक वसाहतींना खेटून असणारा मतदारसंघ म्हणजे भोसरी. दहा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर लांडगे तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. मतदारसंघात त्यांनी आंध्रा धरणाचे पाणी आणले आहे, तर भामा-आसखेड प्रकल्पाच्या कामाचे उद्घाटन झाले आहे. जगातील सर्वांत मोठा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि संविधान भवन येथे उभारले जात आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मोशी येथे ८५० खाटांचे मोठे रुग्णालय बांधण्यात येणार असून त्याचे उद्घाटन झाले आहे. यासह विकासकामांची जंत्रीच लांडगे यांच्याकडून मांडली जात आहे.दहा वर्षांतील प्रलंबित प्रश्न घेऊन महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे परिवर्तन करण्यासाठी साद घालत आहेत. विस्तारित भागातील सोसायट्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा, महापालिकेत समाविष्ट गावांतील रखडलेला विकास, उद्योजक आणि व्यापाऱ्यांना गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराचा करावा लागणारा सामना हे मुद्दे तापवत गव्हाणे रिंगणात उतरले आहेत.मतदारसंघातील कळीचे मुद्देनव्याने झालेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अपुरा पाणीपुरवठा. टँकरने पाणीपुरवठ्यासाठी रहिवाशांना करावी लागणारी पदरमोड.पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी. मतदारसंघातील अरुंद रस्ते, नदीकाठावरील घरांची अतिक्रमणे, शहरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण.परिसरातील उद्योजक-कामगारांची सुरक्षा, उद्योगधंद्यांना खंडित वीजपुरवठ्यामुळे येणाऱ्या अडचणी. मतदारसंघात वाढलेली गुन्हेगारी.२०१९ मध्ये काय घडले?महेश लांडगे (भाजप) विजयी१ लाख ५९ हजार २९५विलास लांडे (अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत)८१ हजार ७२८

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mahesh landgeमहेश लांडगेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारBJPभाजपा