शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विवाहेच्छुक तरुणाची इच्छामरणाची मागणी : मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 12:39 IST

आजारी आणि वयोवृद्ध आई वडिलांचा स्वीकार करणारी बायको मिळत नसल्याच्या कारणावरून निराश झालेल्या तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे.

पुणे :आजारी आणि वयोवृद्ध आई वडिलांचा स्वीकार करणारी बायको मिळत नसल्याच्या कारणावरून निराश झालेल्या तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. तरुणाने या संदर्भात लिहिलेल्या पत्राची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना त्याची समजूत काढण्याचे आदेश दिले आहेत.   याबाबत अधिक माहिती अशी की, 32 वर्षांचा हा तरुण पुण्यातील दत्तवाडी भागात आई वडिलांसोबत वास्तव्यास आहे. त्याच्या आईला पार्किन्सन आजार असून वडिलांचे वय 85 वर्ष आहे. या दोघांचीही जबाबदारी त्याच्यावर असून तो त्यांची काळजी घेत आहे. दरम्यान, त्याच्याकडे स्वत:चे घर असून चांगल्या पगाराची नोकरी आहे.अशा स्थितीत एक सुयोग्य जोडीदार मिळावी यासाठी त्याने शोध सुरू केला.मात्र आजारी आई आणि वयोवृद्ध वडील आहेत समजल्यावर प्रत्येक मुलीने त्याला नकार दिला आहे.अखेर हा तरुण निराशेच्या गर्तेत सापडला आणि त्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या काळात आत्महत्येचे विचारही त्याच्या मनात आले.मात्र, आत्महत्या गुन्हा आहे असे समजल्यावर त्याने मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी केली. मुख्यमंत्री कार्यालयानेही या पत्राची दखल घेतली असून दत्तवाडी पोलीस स्टेशनचे देवीदास घेवारे यांनी तरुणाचा शोध घेऊन समजूत काढली आहे. अखेर मोठे प्रयत्न केल्यावर या चचेर्ला यश आले आहे असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिसDeathमृत्यू