विंगकमांडर अभय जोशी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:11 AM2020-11-28T04:11:31+5:302020-11-28T04:11:31+5:30

पुणे : एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष विंग कमांडर अभय जोशी (७४) यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. ...

Wing Commander Abhay Joshi passes away | विंगकमांडर अभय जोशी यांचे निधन

विंगकमांडर अभय जोशी यांचे निधन

Next

पुणे : एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष विंग कमांडर अभय जोशी (७४) यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले.

एस. एम. जोशी यांचे ते द्वितीय चिरंजीव होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे आहेत. वैकुंठ स्मशानभूमी येथील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतीय वायुदलातून विंग कमांडर म्हणून निवृत्त झालेल्या अभय जोशी यांनी पाकिस्तानविरुध्दच्या दोन युध्दात सहभाग घेतलेला होता. निवृत्तीनंतर त्यांनी एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. अभय जोशी यांनी स्वकष्टार्जित संपत्तीतून अनेक गरजू आणि होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य व कार्यकर्त्यांना आजारपणात आर्थिक सहकार्य केलेले आहे.

Web Title: Wing Commander Abhay Joshi passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.