गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक निधी उभारणार; डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांचा मानस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 17:04 IST2025-04-17T16:59:30+5:302025-04-17T17:04:38+5:30

गोरगरीबांसाठी शिक्षण उपलब्ध व्हावं, हे माझं स्वप्न आहे. केवळ फी भरता आली नाही म्हणून कोणी शिक्षणापासून वंचित राहायला नको

Will raise educational funds for needy students; Dr. Ajinkya D. Y. Patil's intention | गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक निधी उभारणार; डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांचा मानस

गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक निधी उभारणार; डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांचा मानस

पुणे : कोणीही आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक निधी उभारण्याचा मानस अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केला.

सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील आणि मनीषा पाटील यांनी तेजनाथ बाबा यांच्या उपस्थितीत अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाला एक कोटी रुपयांची देणगी दिली. यावेळी डॉ. अजिंक्य पाटील बोलत होते.

कार्यक्रमाला विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर, कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. कमलजीत कौर, सल्लागार शंकर नारायण, उद्योजक अशोक खांदवे, रमेश पाटील यांचे कुटुंबीय आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

डॉ. अजिंक्य पाटील म्हणाले, “गोरगरीबांसाठी शिक्षण उपलब्ध व्हावं, हे माझं स्वप्न आहे. केवळ फी भरता आली नाही म्हणून कोणी शिक्षणापासून वंचित राहायला नको. त्यामुळेच शैक्षणिक निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. रमेश पाटील यांच्या देणगीने या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.”

रमेश पाटील म्हणाले, “समाजाचे काहीतरी देणे लागते, हा संस्कार डॉ. डी. वाय. पाटील यांनी दिला. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.” डॉ. एकनाथ खेडकर म्हणाले, “समाजकार्यात वाहून घेतलेले सर्वजण वंदनीय असतात. रमेश पाटील यांचे शैक्षणिक कार्य मोठे आहे.” कार्यक्रमाला तेजनाथ बाबा यांनी शुभाशीर्वाद दिले.

Web Title: Will raise educational funds for needy students; Dr. Ajinkya D. Y. Patil's intention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.