मद्यपान करुन त्रास देणाऱ्या नवऱ्याचा केला खून; पोलिसांनी पत्नीला घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 23:24 IST2024-09-08T23:24:28+5:302024-09-08T23:24:59+5:30

पुण्यात पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Wife killed the husband who was harassing him by drinking alcohol | मद्यपान करुन त्रास देणाऱ्या नवऱ्याचा केला खून; पोलिसांनी पत्नीला घेतलं ताब्यात

मद्यपान करुन त्रास देणाऱ्या नवऱ्याचा केला खून; पोलिसांनी पत्नीला घेतलं ताब्यात

धायरी: दारू पिऊन वारंवार त्रास देऊन भांडण करणाऱ्या नवऱ्याचा पत्नीने खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नऱ्हे येथे घडली आहे.  किरप्पा बिष्त (वय: ४२ वर्षे, मूळ रा. नेपाळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी त्याची पत्नी हिरा बिष्त ( वय:४६ वर्षे) हिला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नऱ्हे परिसरातील मानाजी नगर येथील स्वप्नपूर्ती रेसिडेन्सीमध्ये वॉचमन म्हणून हे पती - पत्नी दोघे राहत होते. किरप्पा हा दारू पिऊन वारंवार त्याच्या पत्नीला त्रास देत होता. रविवारी तो दारू पिऊन आल्यानंतर त्याचे पत्नीशी वाद झाले. त्यानंतर रागाच्या भरात पत्नीने त्याच्या पोटात चाकू भोसकून खून केला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर हे अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचून अधिक तपासाबाबत सूचना केल्या.

Web Title: Wife killed the husband who was harassing him by drinking alcohol