पत्नीचा राग काढला दुचाकीवर! दगडाने केली तोडफोड; पत्नीसह मेव्हणी, सासू सर्वाना केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 14:14 IST2021-06-10T14:13:26+5:302021-06-10T14:14:03+5:30

काही दिवसांपूर्वी झाली होती पती आणि पत्नी दोघांमध्ये भांडणे

Wife gets angry on bike! Vandalism done with stones; Mevhani along with his wife, mother-in-law were all beaten | पत्नीचा राग काढला दुचाकीवर! दगडाने केली तोडफोड; पत्नीसह मेव्हणी, सासू सर्वाना केली मारहाण

पत्नीचा राग काढला दुचाकीवर! दगडाने केली तोडफोड; पत्नीसह मेव्हणी, सासू सर्वाना केली मारहाण

ठळक मुद्देपतीला गाडीचे नुकसान करताना पाहून पत्नी बाहेर आली होती. तेव्हा तिच्या डोक्यात दगड मारला

पुणे: पत्नीबरोबर झालेल्या जुन्या भांडणातून पतीने पत्नीचा राग तिच्या दुचाकीवर काढला असून दगडाने गाडीची तोडफोड केली. तसेच पत्नीसह मेव्हणी व सासुला मारहाण केली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी ३० वर्षाच्या पतीला अटक केली आहे. याबाबत एका २३ वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

फिर्यादी व आरोपी हे दोघेही पती पत्नी आहेत. ते धनकवडीतील संभाजीनगर येथे रहातात. मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडणे झाली होती. पत्नी या आईकडे गेल्या होत्या. त्यांचा पती ९ जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता तेथे आला. त्याने पत्नीची दुचाकी घेऊन रस्त्याच्या मध्यभागी लावली. गाडीचे पुढील मडगार्ड व पत्रा, पुढील, मागील हेडलाईट दगडाने फोडले. गाडीचे १० हजार रुपयांचे नुकसान केले. आवाज ऐकून त्या बाहेर आल्यावर पतीने त्यांच्या डोक्यात दगड मारला. हाताने मारहाण केली. त्यांना सोडविण्यासाठी पत्नीच्या आई व बहिण आल्या असताना त्यांनाही त्याने मारहाण केली. त्यानंतर पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेत पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहेत.

Web Title: Wife gets angry on bike! Vandalism done with stones; Mevhani along with his wife, mother-in-law were all beaten