इंदापूर तालुक्यात विधवा सुनेला मारहाण, सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 19:44 IST2021-06-02T18:29:01+5:302021-06-02T19:44:26+5:30

सख्या दिराकडूनही विधवेचा विनयभंग, आई भांडण सोडवण्यासाठी आल्यावर त्यांनाही दमदाटी व शिवीगाळ केली

Widow Sunela beaten up at Pithewadi in Indapur taluka, case filed against six persons of father-in-law. | इंदापूर तालुक्यात विधवा सुनेला मारहाण, सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल

इंदापूर तालुक्यात विधवा सुनेला मारहाण, सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देघर सोडुन जाण्यासाठी विधवेचा शारीरीक व मानसिक छळ

बाभुळगाव: इंदापूर तालुक्यातील पिठेवाडी येथे विधवा सुनेला घर सोडुन माहेरी निघुन जात नसल्याच्या कारणांवरून लाथाबुक्यांनी मारहाण करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

याबाबत विधवा महिला श्रीमती सुनिता हनुमंत पोमणे (वय ३०रा.पिठेवाडी  इंदापूर) यांनी या प्रकरणी इंदापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पुष्पा नरहरी पोमणे (सासु), गौरव नरहरी पोमणे (दीर),किरण नरहरी पोमणे (दीर), स्वाती गौरव पोमणे (जाऊ) (रा.पिठेवाडी इंदापूर) व शुभम चंद्रकांत नाळे आणि योगेश चंद्रकांत नाळे (रा.पाहुणेवाडी, ता.बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेचे पती हनुमंत पोमणे यांचे चार वर्षापूर्वी निधन झाले असून त्यांना चार वर्षांची लहान मुलगी आहे. महिला मुलीसह सासरी राहत आहे. ३१ मेला रात्री १० च्या सुमारास महिला व त्यांची आई घरी असताना आरोपींनी संगनमत करून घर सोडून जात नसल्याच्या कारणावरून वाद घातला. त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच (दीर) गौरव नरहरी पोमणे याने वाईट उद्देशाने महिलेचे कपडे फाडून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. महिलेची आई भांडण सोडवण्यासाठी आल्यावर त्यांनाही दमदाटी व शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. 

Web Title: Widow Sunela beaten up at Pithewadi in Indapur taluka, case filed against six persons of father-in-law.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.