श्री क्षेत्र भीमाशंकरला 'डांकिन्याम भिमाशंकरम्' असं का म्हणतात? जाणून घ्या इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:36 IST2025-08-11T15:36:00+5:302025-08-11T15:36:26+5:30
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग असून त्यास डांकिन्याम भिमाशंकरम् असे म्हणतात

श्री क्षेत्र भीमाशंकरला 'डांकिन्याम भिमाशंकरम्' असं का म्हणतात? जाणून घ्या इतिहास
भीमाशंकर: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे तिसर्या सोमवारी लाखो भाविक भक्तांनी हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय असा जयघोष करत काहीसे ऊन रिमझिम पाऊस अशा वातावरणामध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग असून त्यास डांकिन्याम भिमाशंकरम् असे म्हणतात. श्री क्षेञ भीमाशंकर येथे संहार झालेला आहे. शंकराने त्रिपुरासुराला या ठिकाणी वरदान दिले होते की, स्त्री पुरुष मारू शकणार नाही. म्हणून ञिपुरासुराने असुर रूप घेऊन त्रास देण्यास सुरुवात केली. म्हणून शंकराने पुन्हा अर्ध नारी नटेश्वर रूप धारण करुन कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुराचा संहार केला. शंकराने या ठिकाणी मोठं रूप घेतलं म्हणून याला भीमाशंकर म्हणतात. असुराला मारल्यानंतर अंगातून घाम आला त्या घामातून भीमा नदीची सुरुवात होती. या ठिकाणी भीमा नदीचा उगमस्थान आहे. डांकींनी ही त्रिपुरासुराची पत्नी होती. शंकराने त्रिपुरासुराच्या पत्नीला आशीर्वाद दिला की, तुझा पतीला दिलेले वरदान मी पूर्ण करू शकलो नाही. परंतु तुझ्या नावाने एक क्षेत्र प्रसिद्ध होईल. त्या क्षेत्राला डांकिन्याम क्षेत्र असे म्हणतात. ञिपुरासुराची पत्नी डांकींन्या भीमा नदी व श्री शंकर म्हणून श्री क्षेत्र भीमाशंकरला डांकिन्याम भीमाशंकरम् असे म्हटले जाते अशी अख्यायिका आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर हे श्री क्षेञ भीमाशंकर व पविञ असे ज्योर्तिर्लींग आहे. दरवर्षी संपुर्ण श्रावण महिन्यामध्ये पविञ शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त येत असतात. गेल्या आठ ते दहा दिवसांपासुन ह्या भागामध्ये कडक असा उन्हाळा जाणवत आहे. निसर्ग सौंदर्य फुलले असुन जिकडे तिकडे धबधबे हे खळखळुन वाहत आहेत. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी व पविञ अशा शिवलिंगाचे दर्शन असा दुहेरी योग जुळुण आला त्यामध्येच या वर्षी तिसर्या सोमवार लागुन सलग दोन दिवसाच्या सुट्ट्या आल्यामुळे श्री क्षेञ भीमाशंकर येथे दिवसांमध्ये सलग तीन दिवसांमध्ये सुमारे चार लाख भाविकांनी पविञ अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले.